करीना कपूरसारखे नॅच्युरली मिळतील लाल गुलाबी गाल, टोमॅटोने नाहीशा होतील चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खुणा
टोमॅटो ही एक सामान्य भाजी असून आपल्या रोजच्या आहारात आपण याचा वापर करत असतो. अनेक भाज्यांची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. काहीजण तर टोमॅटो न शिजवता कच्चादेखील खातात. ही एक फळभाजी असल्याने याला कासाचेदेखील खाता येते. अनेक फास्ट फूडमध्येदेखील या टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. टोमॅटो आरोग्यासाठीही फार फायद्याची मानली जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आहारात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाणारी ही भाजी आपल्या सौंदर्यवाढीसाठीदेखील फायद्याची ठरते. होय, टोमॅटोमध्ये असणारे नैसर्गिक गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात.
जर तुम्हाला वृद्धत्वाची समस्या दूर करायची असेल आणि चेहरा नॅच्युरली लाल, गुलाबी हवा असेल तर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटोच्या वापराने चाऱ्यावर नैसर्गिक तेज आणता येते. तसेच याच्या मदतीने नैसर्गिकरित्या गाल गुलाबी करता येतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा कसा वापर करावा याबाबत काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
टोमॅटोमध्ये विटामिन C, विटामिन A, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला स्वच्छ, तजेलदार आणि टवटवीत बनवण्यास मदत करतात. टोमॅटोचा रस त्वचेला टाईट करत असल्याने सुरकुत्यांची समस्या कमी होते आणि चेहरा ताजेतवाने दिसतो. त्यामुळे, टोमॅटो फक्त आहारात नाही, तर त्वचेसाठीही उत्तम पर्याय आहे.
हेदेखील वाचा – अंजीरच्या पाण्याचे आहेत अफलातून फायदे, पुरूषांना होईल उपाशीपोटी पिण्याचा फायदा
हेदेखील वाचा – वजन घटवण्यासाठी चपातीच्या पिठात मिसळा हे पदार्थ, मेणासारखी चटकन वितळेल चरबी
गुलाबी गालांसाठी टोमॅटो एक उत्तम पर्याय आहे. यातील नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स त्वचेची रंगत सुधारतात आणि गालांना गुलाबीपणा देतात. यासाठी टोमॅटोचे रस एका वाटीत घ्या आणि मग यात एक चमचे मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी चेहरा स्वछ पाण्याने धुवा. याचा नियमित वापर केल्यास चेहरा नैसर्गिकरित्या गुलाबी होण्यास मदत होते.
तुम्ही टोमॅटोचा एक साधा फेसपॅक तयार करू शकता. यासाठी प्रथम एका वाटीत टोमॅटोचा पल्प घ्या. मग यात बेसन टाकून मिसळा आणि याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वछ धुवून टाका. या फेसपॅकमुळे चेहरा टाईट होतो आणि चेहऱ्यावर नवीन निखार येऊ लागतो. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे सौंदर्य आणखीन बहारदार बनण्यास मदत मिळते. त्वचेला स्वच्छ, ताजेतवाने आणि गुलाबी ठेवण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय आहे. याच्या नियमित वापरणे नक्कीच प्रभावी परिणाम दिसू लागतात.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.