सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा Ice massage
चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो. स्किन केअर रुटीनमध्ये बदल केल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट त्वचेवर लावले जातात. मात्र महागडे प्रॉडक्ट वापरल्यामुळे काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला सतत वेगवेगळे उपाय करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब झाल्यानंतर त्वचेवरील ग्लो कमी होऊन जातो. धूळ, माती, प्रदूषण इत्यादीमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यास चेहऱ्यावर सतत पिंपल्स, फोड किंवा ऍक्ने येतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? तरुण वयातील ‘या’ चुकांमुळे त्वचा होते खराब, जाणून घ्या सविस्तर
हल्ली सोशल मीडियावर अनेक नवनवीन ट्रेंड येत असतात. मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्याची अंघोळ करतात. तसेच चेहऱ्यावर नियमित बर्फाचे मसाज केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. नियमित चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास त्वचेचे रक्तभिसरण सुधारते आणि चेहरा उठावदार दिसू लागतो. बर्फाचा मसाज केल्यामुळे त्वचेला आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळतो. याशिवाय बर्फाचा मसाज केल्यामुळे त्वचेच्या रंगावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर नियमित बर्फाचा मसाज केल्यामुळे त्वचेमध्ये कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहरा आणि डोळे सुजल्यासारखे वाटू लागतात. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाने मसाज करावा. यामुळे त्वरित आराम मिळेल आणि त्वचा पहिल्यासारखी सुंदर होतील.
त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स कमी करण्यासाठी बर्फाने मसाज करावा. मुरुमांचा लालसरपणा आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाचा मसाज प्रभावी ठरेल. यामुळे त्वचेवरील पिंपल्स लवकर कमी होतील.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी बर्फाने मसाज करावा. बर्फाचा मसाज केल्यामुळे त्वचेवरील तारण्या कायम टिकून राहते आणि चेहरा उठावदार दिसू लागतो. तसेच मेकअप करण्याआधी त्वचेवर बर्फ लावल्यास मेकअप अधिककाळ व्यवस्थित टिकून राहील.