Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीमध्ये फटाके फोडताना हात भाजल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम

घरोघरी मातीचे दिवे, रंगीत कंदील, रांगोळ्या, फराळ आणि नवीन कपडे घालून छान दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 31, 2024 | 02:00 PM
हात भाजल्यास 'हे' घरगुती उपाय करा

हात भाजल्यास 'हे' घरगुती उपाय करा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. घरोघरी मातीचे दिवे, रंगीत कंदील, रांगोळ्या, फराळ आणि नवीन कपडे घालून छान दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पण फटाके फोडताना आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. लहान मुलांनी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीमध्ये फटाके फोडताना आरोग्याची सुद्धा तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)

फटाके फोडताना अनेकदा लहान मुलांना चटका लागतो किंवा हात पाय भाजलेले जातात. अशावेळी अनेक लोक भाजलेल्या हातावर सफेद रंगाची टूथपेस्ट लावतात. पण टूथपेस्ट लावण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ लावावे. जेणेकरून भाजलेली जखम किंवा चटका लागलेला हात लवकर बरा होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया हाताला किंवा पायांना चटका लागल्यानंतर कोणत्या घरगुती उपाय करावे.

हे देखील वाचा: Diwali: शहराचं सांस्कृतिकपण जपण्यासाठी ढोल ताशांना परवानगी दिली पाहिजे- दिपेश म्हात्रे

जखम स्वच्छ करून घ्या:

फटाके फोडताना भाजल्यानंतर किंवा चटका लागल्यानंतर जखम वाढू नये म्हणून सगळ्यात आधी जखम स्वच्छ करून घ्या. जेणेकरून जखम जास्त चिघळणार नाही. घरगुती उपाय करण्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा औषध उपचार करावे. हातावर किंवा इतर ठिकाणी चटका लागलेल्या शरीराच्या अवयवांवर फटाक्यांचा मसाला किंवा बारूद असते. ते स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर त्यावर तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही मलम किंवा औषध लावा.

जखमेवर खोबरेल तेल लावा:

जखम झालेल्या ठिकाणी इतर कोणताही पदार्थ लावण्याऐवजी खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेवर थंडावा मिळतो. तसेच जखम थोड्या प्रमाणात बरी झाल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने मसाज करावे. जास्त वेळ मसाज करू नये.

हे देखील वाचा: Diwali 2024 : यंदा लक्ष्मीपूजन नेमकं कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा विधी

इतर गोष्टींची काळजी घ्यावी:

  • दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके फोडताना लहान मुलांना एकट्याला सोडून जाऊ नये. त्यांच्यासोबत थांबून योग्य ती काळजी घ्यावी. वडीलधाऱ्यांच्या देखरेखीखाली मुलांना ठेवावे.
  • फटके लावताना किंवा वेळी इतर वेळी हात भाजल्यानंतर टूथपेस्ट लावू नये. यामुळे जखम लवकर बरी होत नाही.
  • भाजल्यानंतर किंवा चटका लागल्यावर हातांवर आलेले पाण्याचे फोड फोडण्याची चूक करू नये. असे केल्यामुळे जखम आणखीन वाढू लागते आणि जखम झालेल्या ठिकाणी जास्त वेदना होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: If you burn your hands while bursting firecrackers during diwali try these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 02:00 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2024
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी
1

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी
2

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
3

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब
4

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.