Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tea Side Effects: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करता? थांबा! आरोग्य जपण्यासाठी काय आहे योग्य नियम?

Side Effects Of Drinking Tea after or Before Meal: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण केल्याने किंवा जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 12:46 PM
Photo- Ai generated

Photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • चहा प्यायचा आणि लगेच जेवायचं?
  • शरीरावर काय होतो परिणाम
  • किती वेळाचे अंतर ठेवावे?
अनेक भारतीयांची सकाळची सुरुवात ही चहाच्या कपाने होते. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारच्या जेवणानंतरचा ब्रेक, चहा पिण्याची सवय ही अनेकांच्या दररोजच्या रुटीनचा भाग बनली आहे. काही जणांना जेवणाआधी चहा प्यायला आवडतो, तर काही जण जेवण झाल्यानंतर लगेच चहाचा आस्वाद घेतात. मात्र, चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करणे किंवा जेवणानंतर त्वरित चहा प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. चहामधील काही घटक शरीरातील आयरनच्या शोषणावर परिणाम करू शकतात. त्यामुळे चहा आणि जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे ठरते. यासाठी चहा प्यायल्यानंतर किती वेळाच्या अंतराने जेवण करावे, जाणून घ्या. (Side Effects Of Drinking Tea after or Before Meal)

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

आयरनची कमतरता निर्माण होऊ शकते

चहामध्ये टॅनिन आणि पॉलीफेनॉल नावाची संयुगे असतात, जी नॉन-हीम आयरनचे शोषण कमी करू शकतात. चहा प्यायल्यानंतर लगेच आयरनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या आयरन शोषणात अडथळा येऊ शकतो. यामुळे, ॲनिमिया किंवा लोहाच्या कमतरतेने ग्रस्त असलेल्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

जर तुम्ही पालक, मसूर, चणे, राजमा आणि हिरव्या भाज्या खात असाल, तर त्यानंतर लगेच चहा प्यायल्याने आयरनचे शोषण कमी होऊ शकते. म्हणून, संपूर्ण पौष्टिक लाभ मिळवण्यासाठी, चहा आणि आयरनयुक्त पदार्थांमध्ये अंतर ठेवणे उत्तम आहे.

पचनाच्या समस्या उद्भवू शकतात

चहामधील कॅफीनमुळे काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. जर तुम्हाला आधीपासूनच ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅसचा त्रास असेल, तर चहा आणि जेवणाच्या वेळेकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.

कॅफीनच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

चहामध्ये कॅफीन असते. जास्त चहा प्यायल्याने काही लोकांना अस्वस्थ वाटू शकते. याशिवाय झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे, दिवसभरात जास्त चहा पिणे टाळा.

चहा पिण्यात आणि जेवण करण्यात किती अंतर असावे?

  • जेवणापूर्वी सुमारे १ तास आधी चहा पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • जेवणानंतर किमान १ तासाने चहा पिऊ शकता.
  • आयरनयुक्त पदार्थ आणि चहा यांच्यामध्ये सुमारे १-२ तासांचे अंतर ठेवा.
  • जर आयरनच्या गोळ्या घेत असाल तर चहाबरोबर गोळ्या घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य अंतर ठेवा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bhaubeej 2026: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या ‘या’ खास शुभेच्छा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करणे योग्य आहे का?

    Ans: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करणे शक्यतो टाळावे. चहामधील टॅनिन आणि पॉलीफेनॉलमुळे जेवणातील लोहाच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: जेवणानंतर किती वेळाने चहा प्यावा?

    Ans: जेवणानंतर किमान १ तासाने चहा पिणे चांगले मनाले जाते. विशेषतः लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: जेवणाआधी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

    Ans: जेवणाच्या अगदी आधी चहा पिणे टाळावे. चहामधील कॅफीनमुळे काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Web Title: Health tips drinking tea before or after meals side effects best time to drink tea pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Food Issue
  • health care news
  • Health Care Tips
  • tea side effects

संबंधित बातम्या

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत
1

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
2

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या
3

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Amravati News: रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला ‘ब्रेक’
4

Amravati News: रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला ‘ब्रेक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.