पित्ताशयात खडे झाल्यास आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचा सेवन
शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे पोट. अन्नपदार्थ साठवण्यासाठी आणि खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी पोट अतिशय महत्वाचे आहे. शरीरात असलेले सगळ्यात लहान अवयव कायम निरोगी राहण्यासाठी अनेक महत्वपूर्ण कामे करत असतात. त्यातील महत्वाचा अवयव म्हणजे पित्ताशय. यकृताखालील अवयवात पित्तरस साठून राहतो. शरीरातील पित्तरसामुळे अन्नातील चरबी पचन होते. पण जीवनशैलीतील चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. पित्ताशयात कोलेस्टेरॉल, कॅल्शियम किंवा इतर घटक साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. हे घटक पित्ताशयात तसेच साचून राहतात. त्यानंतर ते हळूहळू मुतखड्याचे स्वरूप घेतात. ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे शरीरात अजिबात दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने अपचन, पोटात जडपणा, सौम्य वेदना इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला मुतखडा हळूहळू शरीराला हानी पोहचवतो. यामुळे पोटात तीव्र वेदना, उलट्या, पचन बिघडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. पित्ताशयात वाढलेले खडे कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पित्ताशयात खडे झाल्यास कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचते.
पित्ताशयात खडे वाढू नये आहारात रेड मीट, प्रोसेस्ड स्नॅक्स, पॅकेज्ड फूड, जास्त बटर–क्रीमयुक्त पदार्थ खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पित्ताशयावर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय मैदा, पांढरा भात, साखर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यामुळे पित्ताशयात बारीक बारीक कण जमा होऊन हळूहळू खडे तयार होतात. तसेच पित्ताशय कायमच निरोगी ठेवण्यासाठी वजनावर नियंत्रण असणे अतिशय महत्वाचे आहे . शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आहारात तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन करू नये.
पित्ताशयात वाढलेले खडे कमी करण्यासाठी नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे.यासोबतच नारळपाणी, लिंबाचा रस, ग्रीन टी प्यायल्यामुळे लघवीवाटे घाण शरीराच्या बाहेर निघून जाते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यामुळे पित्ताशयावरील ताण कमी होतो आणि मुतखडा फुटून जाण्यास मदत होते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. याशिवाय लिव्हर आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे. यामुळे लिव्हर आणि पित्ताशय दोन्ही सुद्धा निरोगी राहते.
पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता! ‘टिप्स’ जे वाचवतील आयुष्य
पित्ताशयातील खडे म्हणजे काय?
पित्ताशय (गॅल ब्लॅडर) हा यकृताखाली असलेला एक अवयव आहे जो पित्त साठवतो, जे चरबी पचवण्यासाठी मदत करते. पित्ताशयात पित्ताचे गोठलेले खडे तयार होतात, त्यांना पित्ताशयाचे खडे किंवा गॅलस्टोन म्हणतात.
पित्ताशयात खडे कारणे काय आहेत?
पित्तात घटकांचे असंतुलन:पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा बिलीरुबिनचे प्रमाण जास्त असणे किंवा पित्त लवण कमी असणे, यामुळे खडे तयार होऊ शकतात.
पित्ताशयाच्या पथरीवर उपचार कसे केले जातात?
जास्त चरबीयुक्त पदार्थ, तळलेले अन्न, मांस, चिकन, मासे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत. पित्ताशयाच्या पथरीसाठी हा सर्वात सामान्य उपचार आहे, ज्यामध्ये कमीतकमी आक्रमक ‘कीहोल’ शस्त्रक्रियेद्वारे पित्ताशय काढून टाकला जातो.