धक्कादायक! मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
जगभरात वेगवेगळे विषाणू पसरू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. परदेशात ‘ब्रेन इटिंग अमीबा’ नावाच्या हानिकारक विषाणूची अनेकांना लागण झाली आहे. त्यानंतर या विषाणूने आपल्या देशात सुद्धा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कोझिकोड जिल्ह्यात एका नऊ वर्षीय मुलीचा या गंभीर विषाणूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखीनच दोन रुग्ण ब्रेन इटिंग अमीबाने त्रस्त आहेत. तलावातील पाण्यात किंवा अंघोळीच्या पाण्यातून हा विषाणू थेट शरीरातून मेंदूमध्ये प्रवेश करतो. ब्रेन इटिंग अमीबाची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र हळूहळू हा आजार अतिशय गंभीर होऊन मेंदूच्या पेशींना इजा पोहचवतो. आज आम्ही तुम्हाला ब्रेन इटिंग अमीबाची लागण झाल्यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, यावरील नेमका उपाय काय, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरमध्ये जमलेल्या घाणीला मिनिटांत करा साफ! रोज प्या ‘हे’ पेय, होतील अमाप फायदे
ब्रेन इटिंग अमीबा म्हणजेच नेगलेरिया फाउलेरी. हा एक सूक्ष्मजीव आहे. हा विषाणू आधी शरीरात प्रवेश करतो आणि त्यानंतर थेट मेंदूमध्ये प्रवेश करतो. या आजाराला वैद्यकीय भाषेत अमीबिक इंसेफेलाइटिस म्हणतात. ब्रेन इटिंग अमिबा सुरुवातीला नाकातून प्रवेश करतो, त्यानंतर हळूहळूया मेंदूपर्यंत पोहचतो. मेंदूच्या पेशींचे हळूहळू नुकसान करतो, ज्यामुळे डोकेदुखी, ताप, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. मात्र योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.
मेंदूच्या विषाणूची लागण दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होते. तलाव, डबकी, अस्वच्छ स्विमिंग पूल किंवा घाणेरड्या पाण्याच्या वाटर पार्कच्या सानिध्यात आल्यामुळे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. दूषित पाणी नाकावाटे शरीरात जाते आणि नाकाच्या नसांमध्ये मेंदूमध्ये पोहचते. शरीरात गेलेले पाणी गिळल्यानंतर धोका कमी होतो पण नाकावाटे पाणी शरीरात गेल्यामुळे विषाणूचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी भरलेल्या ठिकाणी पोहायला किंवा भिजायला जाऊ नये.
फक्त Cheating नाही तर 8 कारणांमुळे उडतो नात्यावरील विश्वास, Relationship Expert ने केला खुलासा
ब्रेन इटिंग अमीबापासून शरीराचा बचाव करण्यासाठी पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. लहान मुलांना दूषित पाण्यात किंवा पाणी साचलेल्या तलावात पोहायला पाठवू नये. शरीरात डोकेदुखी, ताप, मळमळ यासारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत.