फोटो सौजन्य: iStock
हार्ट अटॅक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पूर्वी हा फक्त जेष्ठांमध्ये आढळला जात होता. पण आज तरुणांना सुद्धा हार्ट अटॅक येताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे बदलती लाइफस्टाइल आणि चुकीच्या आहार पद्धती. जर तुम्हाला हार अटॅक येत असेल तर तुम्ही आरामदायी स्थितीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते पडलेले असो वा बसलेले असो. जरी तुम्हाला झोपावे लागले तरी तुम्ही तुमच्या पाठीवर झोपावे आणि तुमचे पाय वर करावे जेणेकरून तुम्हला श्वास घेणे सोपे होईल.
तुम्ही उशी किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर पाय ठेवू शकता. गुडघे फोल्ड करून पाठ भिंतीवर टेकून जमिनीवर बसा. याला हाफ सिटिंग पोझिशन म्हणतात.
हे देखील वाचा: पोटात वाढतोय कॅन्सरचा ट्यूमर, भूक न लागण्यापासून 5 संकेत जे घेतील जीव
आपण खुर्ची किंवा भिंतीवर देखील झुकू शकता. जर एखाद्याला हार्ट अटॅक आला असेल तर सर्वप्रथम या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना फोन करावा. तसेच ज्या व्यक्तीस हार्ट अटॅक आला आहे त्यांना आरामदायक स्थितीत येण्यास मदत करा. त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला आधार देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे किंवा गुडघ्याखाली एक उशी ठेवा.
जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदयातील रक्त प्रवाह अवरोधित होतो, ज्यामुळे हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशावेळी वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
बहुतेक केसेसमध्ये, हार्ट अटॅक हलक्या अस्वस्थता आणि वेदनांनी सुरू होतो. तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास 911 वर कॉल करा किंवा कोणालातरी लगेच 911 वर कॉल करायला सांगा.
आज जर तुमच्या समोरच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर सर्वप्रथम त्याला सरळ सपाट जागेवर झोपवा. जर ती व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तर त्याची नाडी तपासा. जर नाडी अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आहे. कारण हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचे ठोके बंद होतात, त्यामुळे नाडी सापडत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या छातीवर जोरात ठोसा द्या. तो शुद्धीवर येईपर्यंत हे करत राहा. त्यामुळे त्याचे हृदय पुन्हा काम करू लागेल.
जर कोणी बेशुद्ध झाला असेल आणि त्याची नाडी जाणवत नसेल तर त्याला ताबडतोब हाताने CPR द्या. सीपीआरमध्ये प्रामुख्याने दोन कामे केली जातात. पहिले म्हणजे छाती दाबणे आणि दुसरे म्हणजे तोंडातून श्वास देणे ज्याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात.