
युएईमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय भारतीय विद्यार्थीनीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हार्ट अटॅकची गंभीर लक्षणे?
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
भारतासह जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींना सुद्धा हार्ट अटॅक येतो. युक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय भारतीय प्रवासी विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू विद्यार्थिनीचे नाव आयशा मरियम असे आहे, ती शारजाह इंडियन स्कूलमध्ये ११ वीची विद्यार्थिनी होती. ९ डिसेंबर रोजी ती नुकतीच १७ वर्षांची झाली होती. तसेच तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आयशा अचानक आजारी पडली आणि तिला गुरुवारी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आज आम्ही तुम्हाला तरुण वयात हार्ट अटॅक येण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
हृदयाच्या क्रिया अचानक बंद पडण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बिघाड झाल्यानंतर हृदयाची धडधडणे आणि शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलूया चिकट पिवळ्या रंगाच्या कोलेस्टरॉलमुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते.रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक अडथळे निर्माण होतात. यास चुकीचा आहार, अपुरी झोप आणि वारंवार तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन करणे कारणीभूत ठरते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाच्या पेशींना नुकसान होते, ज्यामुळे कार्डियाक अरेस्ट येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल वेगवेगळ्या गंभीर आजारांचे कारण आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या अन्नपदार्थांचे आहारात अजिबात सेवन करू नये. याशिवाय आहारात फळे, पालेभाज्या, सुका मेवा आणि पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय दिवसभर ३ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. याशिवाय नियमित शारीरिक हालचाली केल्यास संपूर्ण आरोग्य कायमच निरोगी राहील. सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटं व्यायाम, ध्यान, प्राणायाम आणि मेडिटेशन केल्यास मानसिक आरोग्य निरोगी राहील आणि शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.
Ans: हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फ्रक्शन) तेव्हा येतो जेव्हा हृदयाच्या स्नायूंच्या भागामध्ये रक्तप्रवाह अचानक पूर्णपणे किंवा अंशतः थांबतो.
Ans: विलंब न करता तुमच्या स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर (उदा. भारतात 108 किंवा 102) कॉल करा आणि रुग्णवाहिका बोलवा.
Ans: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खा.