
थंडगार वातावरणात चेहऱ्यावर टिकून राहील सोन्यासारखी चमक! हळद- मधाचा 'या' पद्धतीने तयार फेसपॅक
राज्यासह देशभरात सगळीकडे वातावरणात सतत काहींना काही बदल दिसून येत आहेत. कधी थंडी तर कधी ऊन, पाऊस असल्यामुळे आरोग्य काहीसे बिघडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आव्हानत्मक ठरते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडणे, त्वचा निस्तेज होणे, पिंपल्स, काळे डाग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो, ज्यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादने, लोशन, क्रीम इत्यादी अनेक गोष्टी वापरतात. यामुळे काही काळापुरतीच त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंग आणि कोरडेपणापासून सुटका मिळवण्यासाठी हळद आणि मधाचा वापर कसा करा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मधाच्या वापरामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होते आणि चेहरा उजळदार होतो. हळदीच्या वापरामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी होतात.
सुंदर त्वचेसाठी एक ग्लास पाण्यात हळद आणि चमचाभर मध मिक्स करून घ्या. त्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी ओतून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. ५ ते ६ तास फ्रिजमध्ये बर्फ़ सेट झाल्यानंतर आइस क्यूब तयार होतील. तयार केलेले आइस क्यूब नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळेल. यामुळे तुमची त्वचा मुलायम होईल. याशिवाय उष्णतेमुळे किंवा अपचनामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी हळद आणि मध प्रभावी ठरेल. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हळद आणि मध गुणकारी ठरेल.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात मध मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होईल. मध, हळद आणि गुलाबपाणी एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. मध आणि खोबऱ्याचे तेल एकत्र मिक्स करून लावल्यास त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि चेहरा अधिक सुंदर दिसेल.