चेहऱ्यापेक्षा मान खूप जास्त काळपट दिसते? मग टोमॅटोच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. सुंदर दिसण्यासाठी महिला कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात, पण मानेकडे जास्त लक्ष दिले जाते. सतत येणारा घाम, धूळ, मती, प्रदूषण, मान स्वच्छ न करणे किंवा मेकअप व्यवस्थित न काढल्यामुळे मानेवर घाणीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. मानेवर वाढलेल्या काळेपणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. अपुरी झोप, कामाचा तणाव, हार्मोन्सचे असंतुलन, वजन वाढणे, प्रेग्नंसी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मानेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा किंवा महागड्या क्रीमचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा मानेवरील काळेपणाचे चिकट आणि घाणेरडे थर कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी कायमच बाजारातील क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे मानेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. याशिवाय डेड स्किन कमी होण्यास मदत होते. घरगुती पदार्थांमध्ये असलेले गुणधर्म मान स्वच्छ करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. टोमॅटोच्या रसात असलेली गुणधर्म मानेवरील डेड स्किन कमी करण्यासाठी मदत करतील. याशिवाय मान स्वच्छ होईल.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये टोमॅटोचा रस, बेसन आणि चमचाभर दही घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे डेड स्किन कमी होण्यासोबतच मान स्वच्छ होईल. टोमॅटोचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसाच वापर त्वचेवरील डाग घालवण्यासाठी सुद्धा केला जातो. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करते आणि चेहरा सुंदर करण्यास मदत करते. याशिवाय फेसपॅक तयार करताना त्यात थोडस मध मिक्स करावे. मधाच्या वापरामुळे त्वचा उजळदार होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.
मानेवर जमा झालेले टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा आठवडाभर नियमित वापर केल्यास आठवडाभरात मानेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार राहते. टोमॅटोचा फेसपॅक तुम्ही मानेसोबतच चेहरा, हातांचे कोपरे आणि टॅनिंग झालेल्या अवयवाला लावू शकता. फेसपॅक लावल्यानंतर जास्त उन्हात जाऊ नये.






