
घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या 'या' गंभीर आजारांचा धोका
धूप अगरबत्तीच्या धुरामुळे होणारे आजार?
अगरबत्तीमध्ये कोणते विषारी घटक असतात?
धूप आगरबत्तीमुळे खरंच कॅन्सर होतो का?
देवळात गेल्यानंतर किंवा घरातील देवांची पूजा करताना कायमच धूप अगरबत्ती लावली जाते. घरातील वातवरणात आनंद निर्माण होण्यासाठी अगरबत्ती लावली जाते. अगरबत्तीच्या सुगंधी वासामुळे घरातील खूप जास्त प्रसन्न वाटते. अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती लावली जाते. पण घरात वारंवार लावलेली धूप अगरबत्ती आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. यामुळे शरीरसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. एका संशोधनात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, घरात धूप जाळल्यानंतर होणारा सुगंधी धूर हा ५०० सिगारेटच्या धुरा एवढा असतो. त्यामुळे एक धूप अगरबत्ती जाळल्यानंतर घरात ५०० सिगारेटचा धूर निर्माण होतो, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला धूप अगरबत्ती जाळल्यामुळे शरीरावर कोणते गंभीर परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये सूक्ष्म कण आढळून येतात, हे कण शरीरात गेल्यानंतर दमा किंवा श्वासांचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच डोळ्यांची जळजळ आणि त्वचेवर खाज सुटते. अगरबत्तीच्या धुरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकणारी हानिकारक रसायने असू शकतात, ज्यामुळे दीर्घकाळ वापरल्यास फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय धुरामध्ये असलेले रसायने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव आणि अल्झायमरसारख्या समस्या वाढवतात.दमा किंवा अस्थम्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी धूप अगरबत्ती लावलेल्या खोलीत बसू नये. अगरबत्तीचा धूर घरातील हवा प्रदूषित करून टाकते, ज्याच्या परिणामामुळे घरात धूम्रपान केल्यासारखे वाटते. अगरबतीमधून अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडू लागतो, जे शरीरासाठी विषारी ठरते.
Ans: अगरबत्ती जळताना त्यातून निघणाऱ्या धुरामध्ये बेंझीन, फॉर्मल्डिहाइड आणि पॉली ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स सारखे विषारी घटक असतात
Ans: अगरबत्तीच्या धुरामुळे फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचते आणि श्वसनक्षमता ३०% पर्यंत कमी होऊ शकते.
Ans: होय, जरबत्तीच्या धुरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक असल्याने, फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो