
वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा
रोज अंघोळ का करू नये?
रोज अंघोळ केल्यास शरीराचे होणारे नुकसान?
आंघोळीऐवजी या गोष्टी कराव्यात?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अंघोळ करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अजिबात अंघोळ करूशी वाटत नाही. रोज अंघोळ केल्यामुळे शरीरावरील घामाचा वास आणि घाणीचे थर नष्ट होऊन त्वचा स्वच्छ होते. तसेच नियमित अंघोळ करण्याची सवय शरीरासाठी फायदेशीर आहे. पण अनेकांना अंघोळ करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. या गोष्टीवर घरातील मोठी लोक ओरडासुद्धा देतात. अंघोळ केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. पण आता तुम्हाला अंघोळीवरून कोणाचाही ओरडा खावा लागणार नाही. कारण काही दिवसांआधी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, रोज अंघोळ करणे आवश्यक नाही. फॅटलॉस कोच हर्षित राज यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली आहे.त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की रोज अंघोळ का करू नये? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ करू नये. तसेच रिसर्चमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रोज अंघोळ करणे आवश्यक नाही. तीन दिवसातून एकदा अंघोळ करावी. रोज अंघोळ केल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे नियमित अंघोळ करणे टाळावे. थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ न केल्यास शरीराचे आयुर्मान ३४ टक्क्यांनी वाढते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ केल्यास शरीरावर तेल नष्ट होऊन जाते. हेच ऑइल त्वचा कोरडी होण्यापासून, बॅक्टेरियापासून आणि इन्फेक्शन बचाव करते. त्यामुळे हिवाळ्यात रोज अंघोळ करण्याऐवजी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अंघोळ करावी.
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी रोज अंघोळ केल्यास शरीरावरील त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्वचेवरील प्रोटेक्टिव ऑइल लेअर कमी झाल्यानंतर त्वचा खूप जास्त संवेदनशील होऊन जाते. यामुळे इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो. शरीरावरील नैसर्गिक तेल कमी झाल्यानंतर त्वचा खूप जास्त सुकल्यासारखी वाटते आणि तरुण वयातच शरीरावर सुरकुत्या येतात.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफ घेण्याच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल आतून स्वच्छ
सकाळी उठल्यानंतर नियमित अंघोळ करण्याऐवजी त्वचा मॉइश्चरायजर लावून हायड्रेट ठेवावी. हात, पाय आणि संपूर्ण शरीरावर मॉइश्चरायजर लावावे. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि घाणीचा थर कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा अंघोळ करावी. यामुळे शरीर स्वच्छ होईल. रोज हातपाय आणि चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. थंडीत अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करावा. जास्त गरम पाणी वापरू नये. गरम पाण्याच्या अतिवापरामुळे केस आणि त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. तसेच रोज अंघोळ करण्याऐवजी अंडरगारमेंट्स आणि कपडे घालावे.