वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
बालपण, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था या जीवनाच्या तीन महत्तवाच्या अवस्था आहेत. साधारणतः वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता मंदावण्यास सुरुवात होते. मात्र प्रत्येक अवयव वृद्ध होण्याचा एक ठरावीक कालावधी असतो. त्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती. मेंदू आणि फुफ्फुसं हे दोन अवयव आपल्याला आपण वृद्धत्वाकडे झुकत असल्याची जाणीव करून देतात. खरं तर निरनिराळ्या अवयवांची लढण्याची क्षमता ही वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. (फोटो सौजन्य – istock)
विसाव्या वर्षापासूनच मेंदू म्हातारा व्हायला सुरुवात होते. मेंदूमध्ये असणा-या पेशींची (न्युरॉन्स) संख्या आपल्या वाढत्या वयाबरोबर कमी कमी होत जाते. सुरुवातीला आपल्या मेंदूमध्ये १०० दशलक्ष पेशी असतात. चाळीशीनंतर १०,००० पेशी एका दिवसाला कमी व्हायला सुरुवात होते.
वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यांची जवळच्या वस्तू पाहण्याची क्षमता कमी होते. माणसाला चष्मा लागतो. त्यामुळेच चष्म्याला चाळीशी म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे.
५५ वर्षापर्यंत नीट ऐकता येतं. जवळजवळ ६० वर्ष वय झालेले अर्धेअधिक लोक त्यांची ऐकण्याची क्षमता गमावतात किंवा ती कमी होते.
एखादा अपघात किंवा शारीरिक दोष वगळता वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत आपल्याला नीट ऐकता येतं. आपला आवाज वाढत्या वयासोबत कमी आणि घोगरा होत जातो. आवाजाच्या पेटीतील पेशी क्षीण झाल्यामुळे आवाजाचा कर्कशपणा आणि दर्जा कमी होत जातो. एखाद्या स्त्रीचा आवाज हा घोगरा आणि लहान होऊ शकतो. एखाद्या पुरुषाचा आवाज हा बारीक आणि मोठा होतो.
सर्वसाधारपणे वयाच्या चाळीशीपर्यंत काही अपवाद वगळता आपल्या प्रत्येकाचं हृदय चांगलं तंदुरुस्त राहतं. जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपल्या हृदयाची रक्त फेकण्याची क्षमता कमी होते. याचं कारण आहे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होत जाते. त्या कडक होतात. त्यांच्या आत चरबी साठून त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांवर ताण पडतो.
वयाच्या साठीपर्यंत आपल्याला नीट ऐकता येतं. सुरुवातीला आपल्या जिभेवर जवळजवळ १०,००० चव घेणा-या काळ्या (टेस्टबड्) असतात. नंतर ही संख्या अध्यावर येऊ शकते. आपण ६० वर्षाचे झाल्यावर चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होत जाते.
सर्वसाधारणपणे चाळीशीपर्यंत दात चांगले तंदुरुस्त असतात. जसजसे आपलं वय वाढते, आपल्या तोडातील लाळेचं प्रमाण (सलायव्हा) कमी होत. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया (सूक्ष्म जंतू) वाहून नेले जातात. त्यामुळे आपले दात आणि हिरड्या किडू लागतात. चाळीशीनंतर आपल्या हिरड्या खराब होण्यास सुरुवात होते.
स्त्रीच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून तिच्या स्तनातील चरबीचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे स्तनांचा आकार लहान होतो, चाळीशीपासून स्तन ओघळायला सुरुवात होते. नीपलचा भाग आकसतो.
आपल्या वयाच्या विसाव्या वर्षापासूनच फुप्फुसांची क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. चाळीशीनंतर काही लोकांना श्वास कमी पडतो. याला कारणीभूत काही अंशी छातीचे स्नायू आणि छातीचा पिंजरा (रीब केज). हे दोन्ही आखडल्यामुळे श्वसनाची क्षमता कमी होते.
Ans: मेंदू, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते.
Ans: आपल्या शरीराची वाढ साधारणपणे वयाच्या २० व्या वर्षापर्यंत पूर्ण होते. त्यानंतर हाडांच्या ग्रोथ प्लेट्स (growth plates) बंद होतात.
Ans: अवयव वृद्ध होणे म्हणजे त्यांची रचना आणि कार्य करण्याची क्षमता वयानुसार खालावणे. पेशींची झीज होणे,






