वजन वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा
जगभरात अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. पण त्यातील १ टक्के लोक हे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कितीही खाल्लं तरीसुद्धा वजन वाढत नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण वजन न वाढण्यामागे काही कारण सुद्धा आहेत. चुकीचा डाईट फॉलो करणे, आहारात शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टींचे सेवन न करणे, अपुरी झोप इत्यादींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे वजन वाढण्याऐवजी वजन कमी होत जाते. सडपातळ लोकांच्या शरीराची रचना वेगळी असल्यामुळे काहीवेळा त्यांनी खाल्ले पदार्थ पचनास अनेकदा जड जातात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी योग्य तो आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
वजन कमी झाल्यानंतर आहारात दुधाचे सेवन करावे. दुधामध्ये चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, आणि विटामिन आढळून येते. तसेच दुधामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. रोज सकाळी नाश्त्यामध्ये दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळून वजन वाढण्यास मदत होते. कमी झालेले वजन वाढवण्यासाठी दूध हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यावेळी आणि रात्री झोपण्याआधी दुधाचे सेवन करा. एक महिना नियमित दूध प्यायल्यास कमी झालेले वजन वाढेल.
हे देखील वाचा: केसांना संत्र्याचं साल कसं लावायचं?
पचनास हलके असलेले दही खाल्ल्यानंतर आरोग्य सुधारण्यास मदत होते. दह्याचे नियमित सेवन केल्यामुळे वजन वाढण्यासोबतच त्वचेचा काळा पडलेला रंग सुधारण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही मीठासोबत दही खाण्याऐवजी साखरेसोबत दही खावे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करावे. तसेच वजन वाढण्यासाठी रोज एक वाटी दही खाल्ल्यास आरोग्याला फायदा होईल.
हे देखील वाचा: रात्री चुकूनही नका खाऊ ‘ही’ फळं, होऊ शकतो त्रास, जाणून घ्या कारण
चीजमध्ये प्रथिने, कॅल्शियम, चरबी, आणि इतर पोषक घटक आढळून येतात. नियमित चीझचे सेवन केल्यास वजन वाढवणे सोपे जाते. तसेच वजन वाढवण्यासाठी चीज हा एक उत्तम पर्याय आहे. चीजमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी चीज खाणे फायदेशीर आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.