दैनंदिन आहारात फळांचा समावेश नेहमीच केला जातो. अनेक फळांमध्ये पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही फळं दिवसा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पण डॉक्टर रात्री काही फळे खाण्यास मनाई करतात. पण याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया, कोणती फळं रात्री खाऊ नये आणि यामागचे कारण काय.
रात्री ही फळं पाहू नका (फोटो सौजन्य: Freepik)
अननसात ब्रोमेलेन नावाचे अॅन्झाइम असते, ज्यामुळे पचनसंस्थेमध्ये जळजळ होऊ शकते, विशेषत: मोठ्या प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू शकते. यामुळे अस्वस्थता किंवा छातीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शांतपणे झोपणे कठीण होते.
केळींमधे भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर आणि फायबर असते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. नीट पचन न झालया झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही केळी खाऊ नका. यामुळे घशाला सूज देखील होऊ शकते.
टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.
दिवस खाल्ला जाणारा सफरचंद जर तुम्ही रात्री खाल्ले, तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल. कारण रात्री ते खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत त्रास होऊ शकतो.
चिकूमध्ये भरपूर साखर असते, त्यामुळे ते रात्री खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी चिकू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे तुमच्या उर्जेत चढउतार होऊ शकतात आणि झोपण्यास अडथळा येऊ शकतो.