
चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन १० रुपयांच्या 'या' पदार्थांने होईल गायब
तरुण वयात चेहऱ्यावर पिगमेंटेशन, मुरूम आणि मोठे पिंपल्स येतात. याशिवाय वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर वांग येण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये मेलानिन वाढल्यामुळे गालावर खूप जास्त प्रमाणात काळे डाग येतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा पिंपल्समुळे आलेले डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम किंवा सीरमचा वापर करतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावरील काळे डाग कमी होत नाही. याउलट चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी वाटू लागते. नेहमीच त्वचेला ऊन, धूळ, प्रदुषण इत्यादींचा सामना करावा लागतो. याचे त्वचेवर अतिशय वाईट परिणाम होतात. डेडस्किन, पिंगमेंटेशन, ॲक्ने, टॅनिंग, पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर समस्या वाढून चेहरा खूप जास्त विचित्र दिसू लागतो. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्या कमी करण्यासाठी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्यासाठी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
शार्प जो लाईन हवीये? हा व्यायाम करत चला, मिळवाल हवा तसा लुक
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये एक चमचा जेष्ठमध पावडर घ्यावी. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि टोमॅटोचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यासोबतच त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल. तयार केलेल्या फेसपॅकमध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा टाकू शकता. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल.
वारंवार उन्हात गेल्यामुळे त्वचा खूप जास्त काळवंडून जाते. याशिवाय त्वचा चिकट आणि तेलकट झाल्यामुळे त्वचेच्या ओपन पॉर्समध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि फोड येतात. हे फोड कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस अतिशय प्रभावी ठरेल. त्वचेचा रंग उजळदार करण्यासाठी टोमॅटो फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावावा. तसेच तांदळाच्या पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा खूप जास्त उजळदार होते आणि चेहऱ्यावरील चमक कायम टिकून राहते.
चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचे दोन भाग करून त्यावर कॉफी पावडर आणि साखर घालून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करू शकता. यामुळे डेड स्किन कमी होण्यासोबतच त्वचा अतिशय सुंदर होईल. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा कितीही स्वच्छ केली तरीसुद्धा त्वचेवर काळेपणा दिसतो. काळेपणा कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.