Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढता उच्च रक्तदाब Kidney करून टाकेल कायमची निकामी! विषारी घटक नैसर्गिकरित्या फिल्टर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते. पण किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. त्यामुळे किडनी फिल्टर करण्यासाठी करा हे उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 11:30 AM
वाढत उच्च रक्तदाब Kidney करून टाकेल कायमची निकामी! विषारी घटक नैसर्गिकरित्या फिल्टर करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

वाढत उच्च रक्तदाब Kidney करून टाकेल कायमची निकामी! विषारी घटक नैसर्गिकरित्या फिल्टर करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Follow Us:

किडनीचे आजार होण्याची कारणे?
किडनी फिल्टर करण्यासाठी उपाय?
किडनीच्या आजार होऊ नये म्हणून काय करावे?

जगभरात १२ मार्चला जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. किडनीच्या आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतात. किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरातील रक्त शुद्ध करणे, हार्मोन्स संतुलित ठेवणे आणि शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकणे यांसारखी महत्वपूर्ण कामे किडनी करते. पण बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किडनीचे आरोग्य बिघडते. मधुमेह, उच्च रक्तदाब किडनी खराब होण्यामागील महत्वपूर्ण कारण आहे. रक्तातील साखर आणि वाढलेला रक्तदाब किडनीमधील सुषमा घटक आणि रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान पोहचवते. हेच विषारी घटक शरीरातून बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात, ज्याच्या परिणामामुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे, किडनी कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होतात.(फोटो सौजन्य – istock)

World Kidney Day: ‘या’ पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा, विषारी पदार्थांपासून राहाल कायमचं लांब

जगभरात किडनीसंबंधित आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. रक्तात वाढलेली साखर आणि वाढत उच्च रक्तदाब किडनी खराब करून टाकतो. उच्च रक्तदाब वाढल्यामुळे किडनीच्या पेशींचे नुकसान होते. रक्तात वाढलेली साखर जास्त प्रमाणात साचून राहिल्यामुळे किडनीमधील नेफ्रॉन्स ही अतिशय नाजूक यंत्रणा हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. शरीरात जमा होणाऱ्या अतिरिक्त ग्लुकोजमुळे नाजूक फिल्टर्सना सूज येऊन जखमा होतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जात नाहीत. डायबेटीक किडनी डिसीज झाल्यानंतर अनेक वर्ष लक्षणे अजिबात दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणांकडे वाढ होते आणि किडनी निकामी होऊन जाते.

किडनी फिल्टर करण्यासाठी सोपे उपाय:

किडनीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे बंद करावी. तसेच योग्य औषधे, संतुलित आहार आणि साखरेची नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. तसेच आहारात मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. मिठामध्ये असलेले सोडियम किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास किडनीवर जास्तीचा तणाव येत नाही.

World Kidney Day:धूम्रपान करणाऱ्यांना किडनी कर्करोगाचा धोका दुप्पट! ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

किडनी निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ गोष्टी:

किडनी निरोगी ठेवण्यासाठी नियमित ३० मिनिटं व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा. रक्तदाब 130/80 mmHg पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केल्यास किडनी निरोगी राहील. दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. साखरयुक्त किंवा कॅनमधील गोड पेये पिणे टाळावे. शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. याशिवाय किडनीसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत?

    Ans: पाय, घोटे, किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे.

  • Que: किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?

    Ans: मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी इन्फेक्शन किंवा खडे

  • Que: किडनी खराब होऊ नये म्हणून काय करावे?

    Ans: पुरेसे (२-३ लिटर) पाणी प्या, आहारात मिठाचे प्रमाण कमी करा.

Web Title: Increasing high blood pressure will make the kidney fail forever do these simple remedies to filter toxins naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? रोजच्या जीवनात करा ‘या’ सोप्या सवयींचा अवलंब
1

Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? रोजच्या जीवनात करा ‘या’ सोप्या सवयींचा अवलंब

लघवीच्या रंगात कायमच बदल जाणवतो? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
2

लघवीच्या रंगात कायमच बदल जाणवतो? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Kidney Stone: किडनी स्टोनचा धोका वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा; नाहीतर होतील गंभीर परिणाम
3

Kidney Stone: किडनी स्टोनचा धोका वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा; नाहीतर होतील गंभीर परिणाम

वारंवार वेदनाशामक गोळ्या घेता? मग थांबा! मूत्रपिंडावर ताण येत असल्यास दिसून येतात ही गंभीर लक्षणे,
4

वारंवार वेदनाशामक गोळ्या घेता? मग थांबा! मूत्रपिंडावर ताण येत असल्यास दिसून येतात ही गंभीर लक्षणे,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.