Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी

Shev Barfi Recipe : स्वातंत्र्यदिनाचा आनंद गोड पदार्थाने लुटा, घरी बनवा सर्वांच्या आवडीची शेव बर्फी. सिंधी खाद्यसंस्कृतीतील फेमस हा पदार्थ चवीला फार छान लागतो आणि अनेक खास प्रसंगी घरी तयार केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2025 | 11:52 AM
15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी

15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी

Follow Us
Follow Us:

15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) आहे. या दिवशी, 1947 मध्ये भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला आणि म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि स्वतंत्र मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण केले जाते. यासहच या दिवशी अनेकांच्या घरी चांगल्या जेवणाची मेजवानी ठेवली जाते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एका खास पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना खाऊ घाला गरमागरम साजूक तुपातील खिचडी, नोट करा पौष्टिक पदार्थ

शेव बर्फी हा एक अप्रतिम आणि अनोखा गोड पदार्थ आहे, जो बारीक पिवळी शेव आणि मावा यांच्या सुंदर संगमाने तयार होतो. ही मिठाई खास करून दिवाळी, होळी किंवा खास समारंभांमध्ये बनवली जाते. शेवेचा हलकासा कुरकुरीत टेक्स्चर आणि बर्फीची मऊ, गोड चव यामुळे हा पदार्थ खाल्ल्यावर तोंडात अप्रतिम स्वाद पसरतो. घरच्या घरी सेव बर्फी बनवणे सोपे असून कमी वेळात तयार करता येते. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • पिवळी गोड सेव – २ कप
  • मावा (खोवा) – १ कप
  • साखर – १ कप
  • दूध – ½ कप
  • वेलची पूड – ½ चमचा
  • केशर – १ चिमूट (ऐच्छिक)
  • तूप – २ चमचे
  • काजू-पिस्ता (सजावटीसाठी) – आवश्यकतेनुसार
कृती
  • यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मावा टाकून हलक्या आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि दूध घालून १ तार पाक तयार करा.
  • पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला मावा टाकून चांगले मिसळा.
  • यात वेलची पूड आणि केशर टाका, नीट हलवा.
  • गॅस बंद करून गोड पिवळी सेव टाकून हळूवारपणे मिक्स करा, जेणेकरून सेव मोडणार नाही.
  • तयार मिश्रणाला तुप लावलेल्या ताटात किंवा साच्यात ओता आणि वरून काजू-पिस्त्याने सजवा.
  • मिश्रण थंड झाल्यावर चौकोनी किंवा लांबट तुकडे कापून सर्व्ह करा.
  • सेव ताजी आणि गोड असावी, अन्यथा बर्फीची चव बदलू शकते.
  • मावा जास्त भाजू नये, नाहीतर त्याला कडवटपणा येईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

शेव बर्फी किती दिवस ताजी राहते?
ही बर्फी हवाबंद डब्यात ठेवली तर ३-४ दिवस ताजी राहते.

शेव बर्फी पारंपरिक पदार्थ आहे का?
होय, शेव बर्फी सिंधी लोकांची फेमस आणि पारंपरिक डिश आहे.

Web Title: Independence day 2025 special make tasty and sweet shev barfi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
3

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.