
चिकन मटण खायला अजिबात आवडत नाही? मग घरच्या घरी झटपट बनवा मशरूम फ्राईड राईस
घरात पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर नेमके कोणते पदार्थ बनवावे, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच चिकन आणि मटण इत्यादी मांसाहारी पदार्थ बनवले जातात. पण कायमच मांसाहारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि युनिक डिश खाण्यास हवी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मशरूम फ्राईड राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि सॉसचा वापर करून बनवलेला चविष्ट राईस घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडते. शाहकारी लोकांसाठी मशरूम हा पर्याय अतिशय उत्तम आहे. मशरूममध्ये जीवनसत्त्व, खनिज व अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मशरूम खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. मशरूम खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. मशरूम फ्राईड राईस तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मशरूम फ्राईड राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)