
दालखिचडी सोबत खाण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा चमचमीत मसालेदार कढी
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात प्रत्येकाला चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच वरणभात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. रात्रीच्या जेवणात आवर्जून दालखिचडी हा पदार्थ बनवला जातो. कारण रात्रीच्या वेळी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. दालखिचडी बनवल्यानंतर त्यासोबत कढी आवर्जून बनवली जाते. कढीशिवाय दालखिचडीला चवच लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसालेदार कढी कोणत्याही पदार्थांसोबत अतिशय सुंदर लागते. वाफाळत्या खिचडीसोबत कढी खाल्ल्यास जेवणात चार घास जास्त जातील आणि पोटसुद्धा भरेल. दह्याचा वापर करून बनवलेली कढी कोणत्याही वेळी खाऊ शकता. साध्या कढीला काहीजण मसाल्याची फोडणी देतात तर काही हिरव्या मिरचीची फोडणी देऊन त्यात साखर सुद्धा टाकली जाते. चला तर जाणून घेऊया मसालेदार कढी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ