निर्जीव नसांना जिवंत करतो घरातील हा एक मसाला, Weak Nerves असणाऱ्या लोकांना आजपासूनच आहारात करा याचा समावेश
रक्तवाहिन्यांमध्ये एकतर्फी झडपा असतात, ज्या रक्त हृदयाकडे पाठवण्याचे काम करतात. या झडपा कमकुवत झाल्यास रक्त शिरांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे त्या मोठ्या होतात आणि कमकुवत होतात. आजारांचे प्रमाण वाढत असतानाच अनेकांना नासा आता कमकुवत होऊ लागल्या आहेत. नासा कमकुवत होण्यामागे सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होणे ज्यामुळे नंतर रक्ताभिसरण प्रक्रियेत बिघाड होऊ लागतो. कधीकधी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही शरीरातील नसा कमकुवत होऊ लागतात. अशा परिसथितीत शरीराच्या हालचालीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. आपल्या शरीरातील कमकुवत नसा मजबूत आणि जिवंत करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाचीही मदत घेऊ शकता. नसांच्या कमकुवतपणासाठी भारतीय मसाल्यांमधील चक्रफुलाचे सेवन फार फायद्याचे मानले जाते. हे नसांसाठी वेगळ्या पद्धतीने कार्य करते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
वारंवार गुडघे दुखतात? गुडघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम
चक्रफुलाचे पाणी पिण्याचे फायदे
चक्रफुलाचे पाणी शरीरात पसरलेल्या पेशींच्या जटिल आणि विस्तृत जाळ्याला बळकट बनवण्याचे काम करते. ते नसांमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया वेगवान करण्याचे काम करते आणि कोणत्याही कृतीसाठी शरीराची प्रतिक्रियाशीलता वाढवते. यामुळे शरीरातील नसा जलद काम करतात आणि त्या कमकुवत पडत नाहीत. याचे नियमित सेवन तुमच्या नसांची ताकद देखील वाढवते आणि त्यांना आराम देते. याशिवाय, ते नसा आतून निरोगी ठेवते आणि त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारते. या पाण्याचे नियमित सेवन शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करते ज्यामुळे पोट फुगणे, अतिसार यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय याच्या सेवनाने शांत झोप लागण्यासही मदत होते.
चक्रफुलाचे पाणी कधी आणि कसे प्यावे?
स्टार बडीशेपचे पाणी पिण्यासाठी, हे फूल कुस्करून पाण्यात टाका आणि उकळवा. नंतर हे पाणी गाळून त्यात मध घाला आणि हे पाणी प्या. आदल्या रात्री चक्रफुल भिजवत ठेवून सकाळी उठून उपाशी पोटी तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता.
चक्रफुलाचे तेल
काही लोकांच्या नसांमध्ये अस्वस्थता असते आणि त्यांच्या पेटक्यामुळे त्यांना झोप येत नाही. अशा परिस्थितीत, चक्रफुलाचे तेलाने मालिश करणे नसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यासाठी एका वाटीत नारळाचे किंवा मोहरीचे तेल घ्या, यात चक्रफुल टाका आणि तेलाला हलकं गरम करून मग या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी केसांना मालिश करा. हे तेल तुमच्या नसा शांत करण्यास मदत करेल.
चक्रफुलचा काय उपयोग आहे?
चक्रफुलाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे, पचनास मदत करणे, वजन कमी करणे, त्वचेचे आरोग्य वाढवणे आणि श्वसन कार्य सुधारणे असे असंख्य आरोग्य फायदे प्रदान करते.
चक्रफुलाचे सेवन कोणी करू नये?
लहान मुलांनी चक्रफुलाचे सेवन करू नये. मुलांमध्ये चक्रफुलाचे सेवन कदाचित असुरक्षित ठरू शकते. चक्रफुल चहा दिल्याने लहान मुले आणि प्रौढांमध्ये उलट्या आणि झटके यासारखे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.