चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! 'या' हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य
हल्ली कमी वयात महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्यांसोबतच पिंपल्स, वांग किंवा मोठे फोड इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दिसून येतात. यामुळे त्वचा काहीशी खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल केले जाते तर कधी वेगवेगळ्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची गुणवत्ता सुधारली जाते. याशिवाय त्वचा कायमच सुंदर दिसावी म्हणून महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात. स्किन केअर रुटीन फॉलो करताना महागड्या क्रीम किंवा इतर लोशन लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण यामुळे काही काळच त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा अधिकच निस्तेज दिसू लागते. याशिवाय चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बाजारातील महागड्या क्रीमचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायमच टिकून राहतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी कोथिंबिरीच्या पानांचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करेल.
जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. याशिवाय त्वचेच्या समस्येंपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता. यामध्ये असलेले घटक त्वचेवर नैसर्गिक ग्लो देतात. कोथिंबिरीत अॅंटी-ऑक्सीडेंट, बीटा कॅरोटिन, विटामिन सी आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी कोथिंबिरीचा वापर करावा. कोथिंबिरीमध्ये अॅंटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. याशिवाय स्किन इन्फेक्शनपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी आणि त्वचेवर तेलकटपणा कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा वापर करावा.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकून बारीक पेस्ट बनवून वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल आणि सुरकुत्या कमी होतील. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कोथिंबिरीचा फेसपॅक लावावा.