पोटात तुंबलेले गॅस क्षणार्धात पडून जाईल बाहेर!
धावपळीच्या जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आहारात नेहमीच कमी तिखट आणि तेलकट पदार्थ खावेत. पोटात वाढलेला गॅस, अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. पोटात साचून राहिलेल्या हानिकारक वायूंमुळे शरीराच्या पचनक्रियेत अनेक अडथकले निर्माण होतात. पोटात गॅस झाल्यानंतर बऱ्याच घरातील वडिलधारे नाभिमध्ये तेल टाकण्यास सांगतात. नाभिमध्ये तेल टाकल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास नाभिमध्ये तेल टाकावे.(फोटो सौजन्य – istock)
Weight Loss: रोज 1-1 किलो वजन होईल कमी, Baba Ramdev यांनी पोट सपाट करण्यासाठी दिला जबरदस्त उपाय
शरीरातील सगळ्यात महत्वाचाकेंद्रबिंदू म्हणजे नाभी. हा अवयव तब्बल 72,000 नाड्यांशी जोडलेला असतो. नाभिमध्ये तेल घालण्याच्या प्रक्रियेला ‘नाभि पूरण’ किंवा ‘पेचोटी विधी’ असे सुद्धा म्हणतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाभीमध्ये नियमित तेल घातल्यास आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पचनसंस्था, त्वचा, हार्मोन्स आणि सांधेदुखी इत्यादी अनेक समस्यांपासून कायमचा आराम मिळेल.
पोटात वाढलेल्या वेदना, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी नाभीमध्ये तेल टाकावे. नाभीमध्ये तेल टाकल्यामुळे पोटातील वेदनांपासून तात्काळ आराम मिळेल. रात्री झोपण्याआधी नाभीमध्ये एरंडेल तेल टाकल्यास सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. एरंडेल तेल आतड्या सॉफ्ट करण्यासाठी मदत करतात. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते.
महिलांच्या शरीरात मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे कंबर दुखणे, मासिक पाळीतील रक्तस्त्राव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लाग्तात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतात. मात्र असे न करता नाभीमध्ये तेल टाकावे. यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात. आयुर्वेदामध्ये नाभीमध्ये तेल घालण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
शरीरात सतत होणारे बदल, मानसिक तणाव, आहारातील बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा फोड बऱ्याचदा संपूर्ण त्वचा खराब करतात. अशावेळी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करावा. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाहीत