Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला थंडगार गुळाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गुळाचे सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 08:00 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगाची काहिली होते आणि खूप जास्त गरम होऊन घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. दुपारच्या वेळी कुठेही बाहेर गेल्यानंतर थंडगार पेय पिण्याची इच्छा झाल्यास अतिशय आवडीने ऊसाचा रस प्यायला जातो. पण सगळ्यांचं ऊसाचा रस सहन होईल असे नाही. ऊसाचा रस प्यायल्यानंतर अनेकांना अचानक चक्कर येते तर काहींना गरगरल्यासारखे वाटते. त्यामुळे शरीरसंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी ऊसाचा पिणे टाळावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडगार गुळाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गुळाचे सरबत चवीला ऊसाच्या रसासारखे लागेल आणि सरबत पिण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. गूळ शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक मानले जाते. यामध्ये लोह, खनिजे आणि शरीराला ऊर्जा देणारे घटक आढळून येतात. घामामुळे वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी गुळाच्या सरबताचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

साहित्य:

  • गूळ
  • पुदिन्याची पाने
  • पाणी
  • काळे मीठ
  • मीठ
  • बर्फाचे खडे
  • लिंबाचा रस
आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • गुळाचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, गूळ बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात गुळाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घाला.
  • सर्व साहित्य व्यवस्थित बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात बर्फाचे खडे घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • टोपामध्ये थंड पाणी घेऊन त्यात तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. गुळाचे मिश्रण बघून पाणी घालावे.
  • त्यानंतर त्यात काळे मीठ, साधं मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सरबतमध्ये आवश्यकता वाटल्यास बर्फाचे खडे घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार गुळाचे सरबत. हे सरबत प्यायल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळेल आणि थकवा कमी होईल.

Web Title: Instantly make cool jaggery juice at home in hot summer benefits of eating jaggery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • summer drink
  • Summer Food
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.