आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबटगोड चिंच खायला खूप जास्त आवडतात. चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चिंचपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी चिंच आमटी तर कधी चिंचाचा वापर करून माशांचा रस्सा बनवला जातो. चिंच केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारी चिंच कँडी सगळ्यांची आवडीने खाल्ली असेल. चिंच आणि चाट मसाल्याचा वापर करून बनवलेला हा पदार्थ प्रत्येकाने लहान वयात नक्कीच खाल्ला असेल. पण हल्ली बाजारात मिळणारी चिंच कँडी प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त साखरेचा वापर करून बनवली जाते. त्यामुळे स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून झटपट तुम्ही चिंच कँडी बनवू शकता. हा पदार्थ महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो, याशिवाय चव सुद्धा खूप चांगली लागते. चला तर जाणून घेऊया चिंच कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






