चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा 'या' पांढऱ्या डाळीचे सेवन
शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात चिकन, मटण, अंडी इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन केले जाते. पण काही लोक मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाहीत. अशावेळी प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी नेमकं काय खावं? असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात चवळीचे सेवन करू शकता. लहान मुलांसह मोठ्यानं चवळीची भाजी खायला खूप आवडते. चवळीच्या भाजीमध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
चवळीच्या डाळीमध्ये प्रथिने, फायबर्स, लोह, कॅल्शियम आणि विटामिन आढळून येतात, जे शरीराची कमी झालेली ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात चवळीच्या डाळीचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चवळीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चवळीच्या डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आढळून येते. दैनंदिन आहारात नेहमीच चिकन, मटण खाण्याऐवजी चवळीच्या डाळीचे सेवन करावे. 100 ग्रॅम चवळीच्या डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रथिने आढळून येतात. जे शरीराचे स्नायू मजबूत ठेवतात आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. नियमित चवळीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात.
फायबर्सने समृद्ध असलेली चवळीची डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स हृद्यासह शरीराचे रक्षण करते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात चवळीचे सेवन करावे. याशिवाय रक्तवाहिन्या निरोगी राहून रक्तप्रवाह सुधारतो.
अपचन, गॅस, अॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चवळीच्या डाळीचे सेवन करावे. फायबर्सने समृद्ध असलेली चवळीची डाळ पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता सुधारण्यासाठी चवळीच्या डाळीचे सेवन करावे. चवळीच्या डाळीपासून तुम्ही भाजी किंवा आमटी बनवू शकता.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्यास सुरुवात होते. यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजार होऊ शकता. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. चवळीच्या डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे तुम्ही दैनंदिन आहारात चवळीच्या भाजीचे सेवन करू शकता. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चवळीची भाजी खावी.