सकाळच्या वेळी शरीरात 'ही' लक्षणे दिसल्यास तातडीने घ्या डॉक्टरांचा सल्ला
जगभरात HIV संक्रमित लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एचआयव्ही हा गंभीर आजार असून यामुळे शरीरातील इतर अवयवनांचे मोठे नुकसान होते. एक्वायर्ड इम्यून डेफिशिएंसी सिंड्रोम हा HIV विषाणूमुळे होणारा गंभीर आजार आहे. जगभरात सुमारे 4 कोटीपेक्षा जास्त लोक या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मात्र त्यातील 90 लाख लोकांना योग्य उपचार मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपचाराअभावी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. एचआयव्ही हा आजार शरीरातील पांढऱ्या पेशींवर गंभीर परिणाम करतो,ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीर इतर आजारांसोबत लढण्यासाठी सक्षम राहतं नाही. त्यामुळे योग्य वेळी या आजाराची लक्षणे ओळखणं आवश्यक आहे. त्यामुळे आज म्ही तुम्हाला एचआयव्ही झाल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
एचआयव्ही झाल्यानंतर सतत दोन ते तीन दिवस ताप येऊ लागतो. वारंवार ताप आल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. ज्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता जास्त असते. सतत ताप आल्यामुळे शरीर कमजोर होणे. अशक्तपणा थकवा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच स्नायूंमध्ये वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
वारंवार सांध्यांना सूज येणे, वेदना होणे, हाडांचे दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. एचआयव्ही झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये हाडांचे आणि स्नायूंचे दुखणे वाढू लागते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.
एचआयव्ही झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक डोकं दुखणे, घसा कोरडा पडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. याशिवाय डोळ्यांसमोर अंधारी येणे, घसा कोरडा पडणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. झोपेतून उठल्यानंतर हलकेसे डोके दुखणे आणि डोक्यावर ताण आल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
एचआयव्हीचा परीणाम वजनावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे वजन अचानक कमी झाल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात जाणवू लागलेला थकवा वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असतेवजन कमी झाल्यानंतर शरीरात प्रचंड तणाव जाणवतो. त्यामुळे आहार किंवा व्यायामाशिवाय वजन कमी होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.