Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

आयफोनच्या किमतीत परदेशवारी करणं शक्य आहे, फक्त योग्य डेस्टिनेशन आणि बजेट प्लॅनिंग गरजेचं आहे. बालीपासून मॉरीशसपर्यंत हे ५ सुंदर देश कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 08:45 AM
आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या 'हे' ५ अतिशय सुंदर देश

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या 'हे' ५ अतिशय सुंदर देश

Follow Us
Follow Us:
  • आयफोनच्या किमतीपेक्षा कमी बजेटमध्ये बाली, मालदीव आणि दुबईची ट्रिप करता येऊ शकते.
  • ग्रीस आणि मॉरीशस हेही ३ लाखांच्या बजेटमध्ये फिरण्यासाठी सुंदर पर्याय ठरू शकतात.
  • समुद्रकिनारे, निसर्ग, ऐतिहासिक स्थळे आणि लक्झरी अनुभव या देशांमध्ये घेता येतात.
आजकाल अनेकांना आयफोन खरेदी करण्याची चुश्की लागली आहे. नवा आयफोन लाँच झाला की, ग्राहकांची लाईन लागते आणि काही तासातस स्टाॅक पूर्ण संपतो. पण तुम्हाला माहितीये का? लग्झरी साधनांवर आपले लाखो रुपये खर्च करण्याऐवजी याच पैशांत तुम्ही या पैशांत आपल्या कुटुंबासोबत एक इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करु शकता. आयफोनचा आगामी स्मार्टफोन iPhone Duo साधारण ३ लाख रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इतक्या पैशांत तुम्ही जगातील ५ सुंदर देशांना भेट देऊ शकता आणि आपली इंटरनॅशनल ट्रिप पूर्ण करु शकता. आयुष्यात एकदा तरी दुसऱ्या देशाची सहल करावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. अशात आयफोनवर पैसे खर्च करण्याऐवजी याच पैशांत तुम्ही काही देशांची सहल आपल्या कुटुंबासोबत पूर्ण करु शकता. चला या यादीत कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

बाली

फिरण्यासाठी बाली हे एक लोकप्रिय आणि सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. कमी बजेट आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर बाली तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. ३ लाखाच्या बजेटमध्ये दोन व्यक्ती इथे आठवडाभराची ट्रिप प्लॅन करु शकतात. यात फ्लाईट तिकिट, प्रायव्हेट व्हिला आणि राहण्या-खाण्याचा खर्च समाविष्ट होतो. इथे फिरण्यासाठी उबुद, तेगल्लालंग राईस टेरेसेस, उलुवाटू आणि नुसा पेनिडा ही ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात. तुम्हाला इथे समुद्रकिनारा, नैसर्गिक साैंदर्य आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल.

मालदीव

भारतीय पर्यटक अधिकतरवेळी इंटरनॅशनल ट्रीपसाठी मालदीव या ठिकाणाची निवड करतात. इथे समुद्रकिनारा, लग्झरी रिसाॅर्ट्स, व्हिला हे सर्व वाजवी दरात उपलब्ध होते. भारतीयांना इथे व्हिसा फ्रि एंट्री आहे ज्यामुळे प्रवास आणखी सोयीस्कर होतो. जर तुम्ही ४-स्टार किंवा रिसाॅर्टमध्ये राहण्याचा पर्याय निवडत असाल तर ३ लाखांच्या खर्चात तुमची ट्रीप आरामात पूर्ण होईल. या खर्चात इथे तुम्ही ४ ते ५ दिवसांची आलिशान सहल पूर्ण करु शकता.

दुबई

जर तुमचे बजेट ३ लाखांचे असेल तर यात तुम्ही दुबईची सैर करु शकता. इतक्या पैशांत दुबईत ५ ते ६ दिवस आरामात राहता येते. दुबई हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून इथे बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मॉल आणि दुबई फाउंटन सारख्या प्रसिद्ध स्थळांना भेट देता येऊ शकते. इथे तुम्ही गोल्ड शाॅपिंग करु शकता तसेच दुबईचा फेमस कुनाफा देखील खाऊ शकता. दुबईचे चाॅकलेट्स देखील जगभर फार लोकप्रिय असतात.

ग्रीस

भारतातून ग्रीसची आठवडाभराची ट्रीप ३ लाखांच्या बजेटमध्ये पूर्ण करता येऊ शकते. निळ्या पांढऱ्या घरांसाठी ओळखला जाणारा एक प्रसिद्ध युरोपियन देश आहे. ग्रीसमधील अथेन्स, सँटोरिनी आणि मायकोनोस यांसारखी सुंदर शहरे आणि बेट पर्यटकांमध्ये खास लोकप्रिय आहेत. तुम्हाला इथे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे पाहू शकता.

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

मॉरीशस

मॉरीशस हा देश देखील ३ लाखाच्या बजेटमध्ये फिरण्यासाठी एक चांगले इंटरनॅशनल ठिकाण ठरेल. इथे तुम्ही ३ लाखांच्या बजेटमध्ये ५ ते ६ दिवसांची ट्रिप पूर्ण करु शकता. या खर्चात फ्लाईट, उत्तम हाॅटेल आणि राहण्या-खाण्याची चांगली सोय होऊन जाईल. भारतीयांना या देशात फ्रि व्हिसा ऑन अराईव्हल दिले जाते. याची वैधता ६० दिवसांची आहे. यासाठी दूतावासात आगाऊ भेट देण्याची किंवा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणाला ‘समुद्रावरील नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. इथे तुम्हाल हिंदूंची ५२ टक्के लोकसंख्या पाहायला मिळेल. हे ठिकाण निळेशार समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि पर्वतरांगांसांठी खास करुन ओळखले जाते.

 

Web Title: Iphone price international trip 5 budget friendly countries bali maldives dubai greece mauritius

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Abroad Trip
  • iphone
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
1

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
2

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

iPhone: आयफोनच्या नावापुढील छोट्या ‘i’ चा खरा अर्थ काय? इंटरनेट हे उत्तर असेल तर बरोबर नाही
3

iPhone: आयफोनच्या नावापुढील छोट्या ‘i’ चा खरा अर्थ काय? इंटरनेट हे उत्तर असेल तर बरोबर नाही

काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा
4

काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.