
'हनुमान अंश' पाहून कैंची धामला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या
कैंची धामला जाण्याचा रस्ता?
कैंची धाम नैनीतालपासून साधापण १७ किमी अंतरावर आहे. इथे रेल्वे, रस्ता आणि हवाई मार्ग अशा तिन्ही मार्गांनी पोहचता येते. जर तुम्ही इथे रेल्वेने जाण्याचा विचार करत असाल तर काठगोदाम येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे कैंची धामपासून साधारण ३८ किमी लांब आहे. जर तुम्ही रस्ते मार्गाने इथे जाण्याचा विचार करत असाल तर हल्द्वानी आणि भवाली मार्गे कार किंवा बसने ७-८ तासांत तिथे पोहोचू शकता. मुंबईहून थेट कैंची धामला जाणे लांब पडते ज्यामुळे लोक आधी दिल्लीला जाऊन मग इथून प्रवास सुरु करतात. जर तुम्ही इथे विमानाने जाण्याचा विचार केला असेल तर पंतनगर विमानतळ येथील सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळावरुन टॅक्सी करुन तुम्ही कैंची धामला पोहचू शकता.
कैंची धाम दर्शनाची वेळ?
सप्टेंबर ते नोव्हेंबरचा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तथापि, पावसाळी वातावरणात अधिक काळजी घ्यावी कारण यावेळी इथे रस्ते बंद आणि भूस्खलनाच्या समस्या असू शकतात. सकाळी ६.४५ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत धामला भेट देते येऊ शकते. संध्याकाळी ७ वाजता आरतीसाठी धाममध्ये भक्तांची गर्दी जमते. इथे मंगळवारी खास किर्तनाचे आयोजन देखील केले जाते. हा कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असतो.
Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
राहण्याची व्यवस्था?
इथे आश्रमात राहण्याची व्यावस्था फार मर्यादित आहे ज्यामुळे जाण्यापूर्वी आश्रमात किंवा हाॅटेलमध्ये राहण्याची एडव्हान्स बुकिंग आधीच करुन घ्या. लक्षात ठेवा, मंदिराच्या आत मोबाईलचा फोनचा वापर, सेल्फी, फोटोज किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे.