
Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
विनाकारण चेन ओढल्यास शिक्षा होऊ शकते?
लक्षात घ्या, जर कोणत्या प्रवाशाने विनाकारण रेल्वेतील लाल चेन ओढली तर रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अंतर्गत त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. या गुन्ह्यासाठी तुमच्यावर १ वर्षांची पोलिस कोठडी देखील होऊ शकते. तसेच १००० रुपयांपर्यंतचा दंड तुमच्याकडून आकारला जाईल. काही प्रकरणांत जेल आणि दंड दोन्हींची शिक्षा होऊ शकते. मुख्य म्हणजे पोलिस ठाण्यात तुमच्यावर हा गुन्हा कायमस्वरूपी नोंदवला जाईल ज्यामुळे भविष्यात जर तुमची सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
कोणत्या परिस्थितीत चेन ओढणे बरोबर मानले जाईल?
सीसीटीव्ही नाही मग प्रवाशाला पकडणार कसं?
अनेकदा लोकांना वाटतं की, रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चेन विनाकारण ओढली तरी आपण पकडले जाऊ शकत नाही. पण तसं नाहीये, खरंतर रेल्वे सिस्टीम तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक स्मार्ट आहे. जेव्हाही प्रवासी रेल्वेची लाल चेन ओढतो तेव्हा बाहेरील एक छोटा एअर व्हॉल्व्ह लगेच फिरतो. हवा बाहेर पडताना या व्हॉल्व्हमधून एक मोठा आवाज येतो. या आवाजाचा मागोवा घेत रेल्वे सुरक्षा दल आणि लोको पायलट लगेच डब्याजवळ येऊन गुन्हेगाराला रंगेहात पकडतात.