Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Bathing Tips: हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासोबतच मानसिक तणाव सुद्धा कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2025 | 05:30 AM
हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य?

हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर देखील आला होता. मात्र आता पाऊस ओसरून थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हलकीशी थंडी सगळीकडे जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना अंघोळ करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी गरम पाण्याची अंघोळ केल्यास हलकासा उबदारपणा जाणवू लागतो. पण काहींना वर्षाच्या बाराही महिने थंड पाण्याची अंघोळ करण्याची सवय असते. पाऊस असो वा थंडी सर्वच ऋतूंमध्ये थंड पाणी अंगावर घेतले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे योग्य की अयोग्य? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या चुकीच्या सवयी शरीराचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करताना खूप जास्त विचार करावा.(फोटो सौजन्य – istock)

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय

थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे:

आपल्यातील अनेकांना वर्षाच्या बाराही ऋतूंमध्ये थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. ही सवय शरीरासाठी लाभदायी ठरते. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय अनेक लोक आइस बाथ सुद्धा घेतात. आइस बाथ घेतल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.याशिवाय शरीराला आराम मिळून स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी आइस बाथ घ्यावा. मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी.

थंड पाण्याने नियमित अंघोळ केल्यास शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय रक्तप्रवाहात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी थंड पाणी अतिशय गुणकारी आहे. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन जातो, ज्यामुळे केस अतिशय निस्तेज आणि कोरडे होतात. त्यामुळे केस धुवण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. थंड पाण्याने केस स्वच्छ करावेत. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होतात, ज्याचे शरीराला असंख्य फायदे आहेत.

थंड पाण्याची अंघोळ करताना कशी काळजी घ्याल?

थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर काहींना लगेच सर्दी, खोकला किंवा ताप येतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करताना शरीराची काळजी घ्यावी. हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही थंड पाण्याची अंघोळ करू नये. यामुळे रक्तदाब आणखीनच वाढून हृदय आणि मेंदूला हानी पोहचण्याची शक्यता असते. अचानक कोणत्याही वेळी थंड पाण्याची अंघोळ केल्यास शरीराला शॉक बसू शकतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहचू शकते.

Rohit Sharma च्या फिटनेसवर क्रिकेटप्रेमी फिदा! महिनाभरात घटवले तब्बल १० किलो वजन, जाणून घ्या हिटमॅन आहारात काय खातो

FAQs (संबंधित प्रश्न)

हिवाळ्यात अंघोळीसाठी महत्त्वाच्या टिप्स:

खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक सीबम (तेलाचा थर) निघून जातो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. आंघोळ झाल्यावर लगेच त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि कोरडेपणा कमी होतो.

सर्दी-खोकल्याची लक्षणे कोणती?

थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, खोकला, डोकेदुखी, स्नायू दुखणे, भूक न लागणे आणि थकवा.नाक वाहणे, घसा दुखणे, ताप, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी.

हिवाळ्यात आहारात काय खावे?

मेथी, चवळी, मोहरीची पालेभाजी यांचा आहारात समावेश करा, यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग्य वेळी पेरू खाल्ल्याने सर्दी-खोकला टाळता येतो, परंतु चुकीच्या वेळी खाल्ल्याने आजारी पडू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Is taking a cold bath in winter good or bad for the body winter bathing tips health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle news
  • Winter Care

संबंधित बातम्या

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय
1

उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय

Fatty Liver च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ पेयांचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ
2

Fatty Liver च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ पेयांचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ

How To Remove Bilirubin: सडलेले लिव्हर, डोळ्यात कावीळ; घातक विष आहे बिलीरूबीन, 5 पद्धतीने शरीराबाहेर फेका पिवळा कचरा
3

How To Remove Bilirubin: सडलेले लिव्हर, डोळ्यात कावीळ; घातक विष आहे बिलीरूबीन, 5 पद्धतीने शरीराबाहेर फेका पिवळा कचरा

‘या’ कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, आहारात करता येईल मजेदार रेसिपी
4

‘या’ कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, आहारात करता येईल मजेदार रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.