Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिजिकल होण्यासाठी जोडीदार देतोय दबाव? नात्यासाठी असू शकते धोक्याचे संकेत

जर जोडीदार वारंवार फिजिकल होण्यासाठी दबाव टाकत असेल आणि तुमच्या भावनांचा आदर करत नसेल, तर हे नात्यासाठी धोक्याचे लक्षण आहे. अशा वेळी स्वतःच्या भावना, मर्यादा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 17, 2025 | 08:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कोणतंही नातं परस्पर समजूत, विश्वास आणि संमतीवर आधारलेलं असतं. मात्र, जर तुमचा जोडीदार वारंवार फिजिकल होण्यासाठी दबाव टाकत असेल आणि तुमच्या भावना किंवा कम्फर्टचा विचार करत नसेल, तर हे एक “रेड फ्लॅग” आहे. म्हणजेच नात्याला जखमा देणारा स्पष्ट इशारा आहे. मुळात, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. फिजिकल रिलेशनशिपमध्ये दोघांचीही स्पष्ट आणि मनापासून संमती असावी लागते. एकतर्फी दबावामुळे नातं असमतोल होऊ शकतं. काही वेळा काही जोडीदार असेही म्हणतात की, “जर तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर…”, किंवा “सगळी कपल्स असंच करतात”, अशा प्रकारची बोलणी ही इमोशनल ब्लॅकमेलिंगची उदाहरणं आहेत. त्यातून तुमच्यावर भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. हे कोणत्याही आरोग्यदायी नात्याचं लक्षण नाही.

घाईगडबडीच्या वेळी भाजी काय बनवावी सुचत नाही? अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मसालेदार गवारीची भाजी

अनेकदा अशा वागणुकीमुळे व्यक्तीला अपराधी वाटायला लागतं. त्यांना असं वाटतं की, मी त्यांच्या गरजा पूर्ण करत नाही, किंवा मी त्यांना दुखावतो आहे. ही एक प्रकारची मानसिक छळवणूक देखील असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या आतल्या भावना समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. जर नात्यात पुढील गोष्टी वारंवार घडत असतील: तुमच्या नकारानंतरही दबाव टाकणं, तुमच्या भावना दुर्लक्षित करणं, नकार दिल्यावर रागावणं किंवा अंतर ठेवणं, फिजिकल होणं म्हणजेच प्रेम मानणं, तुमच्या संमतीशिवाय स्पर्श करणं किंवा मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करणं. तर हे नातं योग्य दिशेने जात नाही, याची जाणीव असणं गरजेचं आहे.

अशा परिस्थितीत स्वतःच्या भावना आणि मर्यादा यांना प्राधान्य द्या. तुम्ही तयार नसाल, तर ‘नाही’ म्हणणं पूर्णपणे योग्य आहे. तुमचं मत मोकळेपणाने, स्पष्टपणे जोडीदारासमोर मांडा आणि त्याच्या प्रतिक्रियेवर विचार करा. जर कोणी तुमच्या मर्यादा वारंवार ओलांडत असेल, तर त्या नात्याचा पुन्हा विचार करणंही गरजेचं आहे. आणि जर तुम्ही गोंधळलेले किंवा मानसिक तणावात असाल, तर एखाद्या विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा काउन्सलरशी नक्की चर्चा करा.

‘Good Friday’ दिवस म्हणजे प्रभू येशूच्या बलिदानाचा दिवस! पण या दिवसाला ‘Good’ का म्हंटले जाते? जाणून घ्या

स्वतःच्या मन:शांतीसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य निर्णय घेणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा वागणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं, हे तुमचं हक्काचं आणि जबाबदारीचं काम आहे.

Web Title: Is your partner pressuring you to get physical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • Love Relationship tips
  • relationship advice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.