Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे

Japanese Bathing Culture: जपानी जीवनशैलीत, रात्रीची अंघोळ केवळ शरीर स्वच्छ करण्याचे साधन नाही, तर मानसिक शांतीचे साधन देखील आहे. कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे दिवसाचा ताण, ऑफिसमधील तणाव आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 12, 2026 | 01:18 PM
जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे

जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे

Follow Us
Follow Us:

जपानी लोक रात्री अंघोळ का करतात?
शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी काय करावे?
The Boundary Effect म्हणजे काय?

Japanese bathing culture: जगभरातील प्रत्येक देशाची स्वतःची एक अनोखी संस्कृती आणि जीवनशैली असते. जपानबद्दल बोलायचे झाल्यास, तिथल्या तंत्रज्ञानापासून ते लोकांच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते. अलीकडेच, सोशल मीडियावर एक मनोरंजक चर्चा सुरू झाली आहे, जपानी लोक सकाळी अंघोळ करण्याऐवजी रात्री का करतात?

Kolhapur Madhuri Elephant: आर्थरायटिस अन् पायांच्या गंभीर समस्यांवर मात; विशेष उपचारांनंतर माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या मायभूमीत

जपानी लोक रात्री अंघोळ का करतात?

जपानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने या रहस्याचा उलगडा सोशल मीडियाद्वारे केला आहे. तिच्या व्लॉगद्वारे, तिने ‘ओफुरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अनोख्या स्नान संस्कृतीमागील चार प्रमुख आणि मनोरंजक कारणं सांगितली आहे. ती आपल्यालाही माहीत असावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.

The Boundary Effect म्हणजे काय?

The Boundary Effect, म्हणजेच जपानी जीवनशैलीत, रात्रीची अंघोळ केवळ शरीर स्वच्छ करण्याचे साधन नाही, तर मानसिक शांतीचे साधन देखील आहे. शरीरावर कोमट पाणी पडताच, दिवसाचा ताण, ऑफिसमधील तणाव आणि मानसिक थकवा यांचं दार आपोआप बंद होते. हे कोमट पाणी मेंदूला संकेत देते की काम संपले आहे आणि आता आराम करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे रात्री आंघोळ केली जाते.

तसंच जपानी लोकांना स्वच्छतेचे एक अनोखे वेड असते. ते ‘No Outside Dirt’ हे धोरण पाळतात. जपानी लोक दिवसाची धूळ, घाण, प्रदूषण आणि घाम घेऊन कधीही झोपायला जात नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की अस्वच्छ शरीराने झोपल्याने संपूर्ण घर आणि झोपण्याचे वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे, ते रात्री अंघोळ करून आणि स्वतःला पूर्णपणे स्वच्छ केल्यावरच अंथरुणात जातात.

तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार, विशेषतः वयाच्या ४० वर्षांनंतर, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही ताठरपणा येणे, पाठदुखी आणि थकवा सामान्य आहे. या समस्येवर उपचार कसे करायचे हे जपानी लोकांना माहीत आहे. रात्री गरम पाण्याच्या टबमध्ये ज्याला ओफुरो असं म्हटलं जातं त्यात बसल्याने सर्व बंद झालेल्या नसा आणि स्नायू पूर्णपणे शिथिल होतात. शरीराचा सर्व ताठरपणा आणि वेदना त्वरित नाहीशा होतात, ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला अविश्वसनीयपणे ताजेतवाने वाटते.

Oral Hygiene: दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, इन्फेक्शनमुळे होईल नुकसान

आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानी महिलांच्या निर्दोष आणि तरुण त्वचेचे रहस्य या रात्रीच्या आंघोळीत दडलंय. जेव्हा तुम्ही रात्री गरम पाण्याने अंघोळ करता, तेव्हा शरीरात झोप आणणारे हार्मोन मेलाटोनिन स्रवते. जेव्हा तुम्ही गाढ आणि शांतपणे झोपता, तेव्हा त्वचेच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करतात. यामुळेच सकाळी उठल्यावर त्यांची त्वचा ताजीतवानी, चमकदार आणि तरुण दिसते. तुम्हालाही जर हे फायदे हवे असतील तर तुम्ही ही पद्धत नक्कीच स्वीकारू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपानी लोक रात्री आंघोळ का करतात?

    Ans: रात्री आंघोळ करण्यामागे स्वच्छता, दिवसभराचा घाम आणि धूळ दूर करणे तसेच शरीर-मन रिलॅक्स करणे अशी काही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: जपानी लोक आंघोळ करण्यापूर्वी शरीर धुतात का?

    Ans: होय. जपानी स्नानसंस्कृतीत टबमध्ये जाण्यापूर्वी शरीर स्वच्छ धुण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे टबमधील पाणी स्वच्छ ठेवले जाते.

  • Que: रात्री आंघोळ केल्याने झोप चांगली लागते का?

    Ans: कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीर रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही लोकांना झोपण्यापूर्वी अधिक आरामदायी वाटते.

Web Title: Japanese bathing culture why do japanese people bathe at night find out some of the special reasons behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • cleaning tips
  • Japan
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Kolhapur Madhuri Elephant: आर्थरायटिस अन् पायांच्या गंभीर समस्यांवर मात; विशेष उपचारांनंतर माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या मायभूमीत
1

Kolhapur Madhuri Elephant: आर्थरायटिस अन् पायांच्या गंभीर समस्यांवर मात; विशेष उपचारांनंतर माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या मायभूमीत

मुजाहिदीन म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ, उगम आणि दहशतवादाशी संबंध जाणून घ्या
2

मुजाहिदीन म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ, उगम आणि दहशतवादाशी संबंध जाणून घ्या

Relationship Tips: लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री
3

Relationship Tips: लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
4

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.