
60 व्या वर्षीही टिकून राहील 25 सारखी ताकद! पुरुषांसाठी फायदेशीर ठरते ही भाजी; नियमित सेवन स्टॅमिना करते दुप्पट
कोणती आहे ही भाजी?
ही भाजी म्हणजे कलमी सागाची भाजी. हिवाळ्यात या भाजीचे अधिकतर सेवन केले जाते. कलमी साग विशेष करुन पुरुषांच्या आरोग्यासाठी प्रचंड फायद्याचा ठरतो. यामध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, फायबर, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि असे अनेक पोषक घटक आढळून येतात. उत्तर भारतात कलमी साग म्हणून ओळखले जाणारे हे साग वॉटर स्पिनच म्हणूनही ओळखले जाते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कलमी सागात बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन सी आढळतात जे शरीरात अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. या सागाची चवदार भाजी तयार केली जाऊ शकते.
कलमी सागाचा रस बनवूनही याचे सेवन केले जाऊ शकते. पण तुम्हाला जर याचा रस प्यायला आवडत नसेल तर बटाट, वांगा अशा भाज्यांमध्ये मिसळून तुम्ही याचे सेवन करु शकता. नियमित या भाजीचे सेवन केल्यास शरीर, त्वचा आणि मेंदूवर चांगले परीणाम होतात. ते खाल्ल्याने मधुमेहासारख्या आजारांपासून आराम मिळतो. याचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब कमी करण्यासही मदत करते.
पुरुषांसाठी खास फायद्याची आहे भाजी
कलमी सागाच्या भाजीचे सेवन पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवते. ही भाजी पुरुषांची शक्ती वाढवते, यामुळे अनेक आजारांना दूरही ठेवता येते. हे एका औषधासारखे काम करते, जर तुम्हाला यकृताच्या समस्या असतील तर तुम्ही कलमी सागापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. वाढत्या वयातही जर तुम्हाला तुमच्या शरीरात उर्जेला कायम टिकवून ठेवायचे असेल तर याचे सेवन अनेक पटींनी फायद्याचे सिद्ध होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.