(फोटो सौजन्य: Ai Created)
लिंबू आणि बेकिंग सोडा
लिंबू आणि बेकिंग सोड्याचा एकत्रित वापर बदलीवरील चिवट डाग दूर करण्यास उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि एका लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट बादलीच्या घाणेरड्या भागांवर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, स्क्रबरने बदलीला चांगलं घासून काढा आणि मग पाण्याने धुवून बादलीला स्वछ करा.
व्हाईट व्हिनेगर
जर तुमच्या बादलीवर कडक डाग पडले असतील आणि ते पाण्याने निघत नसतील तर यावर व्हाईट व्हिनेगरचा वापर फायद्याचा ठरेल. यासाठी अर्धा कप व्हिनेगर एक मग पाण्यात मिसळा. हे मिश्रण बादलीवर टाका किंवा व्हिनेगरमध्ये कापडात भिजवून मग डाग असलेल्या भागावर पुसा. १० मिनिटांनंतर, ब्रशने बादलीला स्वछ घासून घ्या.
हायड्रोजन पेरोक्साइड
बादलीवर काळे डाग किंवा बुरशी आली असेल तर ते साफ करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी कापसावर थोडे हायड्रोजन पेरोक्साइड घ्या आणि याने बादलीला स्वछ घडून काढा. नंतर साबणाच्या पाण्याने बादलीला स्वछ धुवून काढा.
वॉशिंग पावडर आणि गरम पाणी
बादलीवरील चिकट डाग दूर करण्यासाठी वॉशिंग पावडर आणि पाण्याचा वापर करता येईल. यासाठी बादलीत कोमट पाणी आणि वॉशिंग पावडर मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. नंतर बादलीला स्वछ घासून धुवा आणि कमाल बघा. यातील कोणत्याही घटकाचा वापर करून आपण आपल्या जुनाट आणि घाण दिसणाऱ्या बादलीला नव्यासारखी चमक मिळवू देऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






