
कार्तिकी एकादशीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा
Kartiki Ekadashi 2026: दिवाळी सण संपल्यानंतर सगळ्यांचं कार्तिकी एकादशीची ओढ लागते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी असते. विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी असलेल्या दोन मुख्य एकदशीपैंकी एक म्हणजे कार्तिकी एकादशी. हा दिवस अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. विठ्ठल नामघोषात आणि अभंगाच्या तालावर आळंदी सजून निघते. याशिवाय हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला खूप जास्त महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपतो. त्यामुळे या दिवसापासून शुभ आणि मंगल कार्यांना सुरुवात केली जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या आनंदाच्या दिवशी नातेवाईकांना सुद्धा या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – pinterest)
Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या नियम
विठू माऊलीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीचा वीणा! मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला! कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान विष्णू आणि विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. कार्तिकी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
विठू माऊलीची कृपा
आपण सर्वांवर कायम अशी राहो
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु ॥
कार्तिकी एकादशी निमित्त भक्तीमय हार्दिक शुभेच्छा !!
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ।।
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा !
टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटावरी ठेवोनिया I
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल..
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली,
तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी,
जीवाला तुझी आस का लागली, कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला
जय जय राम कृष्ण हरी
कार्तिकी एकादशी च्या शुभेच्छा !