वर्कआऊट करताना या गोष्टींची काळजी घ्या
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमित व्यायाम आणि योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करत असतात. मात्र असे करण्याऐवजी तुम्ही फक्त सकाळी उठून वर्कआऊट केला तर आरोग्याला सार्वधिक फायदे होतील. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पौष्टिक आहार, चांगली झोप, शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी असावे लागते. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे न करता तुम्ही फक्त सकाळी उठून वर्कआऊट सुद्धा करू शकता. नियमित वर्कआऊट केल्यामुळे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्कआऊट करताना आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आरोग्यासाठी फायदेशीर आहे ग्रीन बदाम, चेहराही उजळेल
व्यायाम किंवा योगासने करून बॉडी दुखू लागल्यास बॉडी मसाज करून घ्यावा. यामुळे शरीराला होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होईल. व्यायाम केल्यामुळे काहीवेळा अंग दुखू लागते. अशावेळी तुम्हाला बॉडी मसाज करू शकता. यामुळे शरीराचे स्नायू हलके होतील आणि शरीराला आराम मिळेल. नियमित मसाज केल्यास शारीरिक वेदना कमी होऊन मानसिक तणाव कमी होईल.
सकाळी उठल्यानंतर व्यायाम करण्याआधी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. यामुळे स्नायू व्यायामासाठी तयार होतात आणि व्यायाम करताना कोणतीही दुखापत होत नाही. स्ट्रेचिंग एक्सरसाइजमध्ये हॅमस्ट्रिंग स्ट्रेच, साइड स्ट्रेच, बटरफ्लाय पोज इत्यादी प्रकार करू शकता. यामुळे व्यायाम करताना जास्त वेदना होणार नाहीत. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
शरीर हायड्रेट असणे आवश्यक आहे. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. व्यायाम करताना घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. शरीरातील पाणी निघून गेल्यामुळे र शरीर अशक्त होऊन जाते. त्यामुळे व्यायाम करताना पाणी प्यावे, जेणेकरून अशक्तपणा किंवा थकवा जाणवणार नाही.
हे देखील वाचा: 5 High Fiber Foods जे करतील बद्धकोष्ठता, कॅन्सर-डायबिटीसला गायब, पचनक्रियाही होईल तगडी
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर शरीरात उत्साह आणि ऊर्जा कायम टिकून राहते. त्यामुळे नाश्ता करावा. नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट, पीनट बटर, केळी, उकडलेले अंडी आणि प्रोटीन बार इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.