(फोटो सौजन्य: Pinterest)
मल्चिंग करा
उन्हाळ्यात कुंडीतील मातीतील ओलावा टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी मल्चिंग ही पद्धत खूप प्रभावी ठरते. मल्चिंग म्हणजे मातीच्या वरच्या थरावर काही नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तूंचे आच्छादन घालणे, यासाठी कोरडी पाने, गवत, नारळाची साल किंवा पेंढा वापरता येतो. यामुळे मातीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि माती लवकर सुकत नाही. याचा परिणाम असा होतो की झाडांची मुळे देखील दीर्घकाळ थंड राहतात.
माती पौष्टिक ठेवा
उन्हाळ्यात इहाडे निरोगी राहण्यासाठी मातीमध्ये पुरेसे पोषक घटक असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी कुंडीत शेणखत किंवा गांडूळखत पासारखी सेंद्रिय खते मिसळणे फायदेशीर ठरते. यामुळे झाडांची मुळे मजबूत होतात आणि झाडांना उष्णता सहन करण्याची ताकद मिळते.
झाडांची नियमित तपासणी करा
उन्हाळ्यात झाडांवर कोटक किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे झाडांची पाने आणि माती वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. जर एखादे पान वाळलेले किंवा खराब झालेले दिसले, तर ते लगेच काढून टाकावे. यामुळे झाड निरोगी राहते आणि त्याची वाढ चांगली होते.
डबल पॉटचा वापर करा
कडक उन्हात कुंड्या खूप गरम होतात आणि त्याचा परिणाम थेट झाडांच्या मुळांवर होतो. हे टाळण्यासाठी कुंडी दुसऱ्या मोठ्या कुंडीत ठेवण्याची पद्धत वापरता येते. पाला डबल पॉट म्हणतात. तसेच कुंडीभोवती कापड, ताग किंवा कोरडे गवत गुंडाळले तरी कुंडीचे तापमान कमी राहते. यामुळे झाडांची मुळे उष्णतेपासून सुरक्षित राहतात.
पानांवर पाण्याचा हलका स्प्रे करा
उन्हाळ्यात झाडांच्या पानांवर हलक्या पाण्याचा स्प्रे केल्याने त्यांना थंडावा मिळतो. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हा स्प्रे करणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे पानांमध्ये ओलावा टिकून राहतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






