Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम

बाजारातील भाज्या ताज्या असतातच असं नाही. पण तुम्ही घरीही किचन गार्डन करून ताज्या भाज्यांची लागवड करू शकता. काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरी नियमित वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे बियाणे नक्कीच लावा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 24, 2026 | 08:32 PM
किचन गार्डनमध्ये कोणत्या भाज्या पावसाळ्यापूर्वी लावाव्या (फोटो सौजन्य - Pinterest)

किचन गार्डनमध्ये कोणत्या भाज्या पावसाळ्यापूर्वी लावाव्या (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यापूर्वी घरातील किचन गार्डनमध्ये कोणते पर्याय 
  • ताज्या भाज्यांसाठी सोप्या पद्धती
  • किचन गार्डनमध्ये नक्की कोणत्या भाज्या लावाव्यात 
पावसाळा जवळ आला आहे. सध्याचे हवामान किचन गार्डनसाठी अगदी योग्य आहे. जर तुम्हाला घरी ताज्या, केमिकलमुक्त भाज्या पिकवायच्या असतील, तर पावसाळ्यापूर्वीचा काळ सर्वोत्तम मानला जातो. या हंगामात, जमीन ओलसर राहते आणि झाडे वेगाने वाढतात. काही भाज्यांची लागवड केल्यास तुम्हाला पावसाळ्यात रसायनमुक्त भाज्यांचा मुबलक पुरवठा मिळू शकतो. आता या भाज्या नक्की कोणत्या आहेत आणि कधी त्याची पेरणी करावी आपण या लेखातून जाणून घेऊया 

भोपळ्याचे वेल ठरतील उत्तम  

भोपळा ही अशी भाजी आहे ज्याची वेल उष्णता आणि आर्द्रता या दोन्हीमध्ये चांगली वाढते. पावसाळ्यापूर्वी पेरणी केल्यास, पाऊस सुरू होताच रोपे वेगाने पसरतात. कमी जागेतही चांगले रोप लागते आणि चांगले उत्पन्न मिळते.

ताजीतवानी भेंडीही लवकर उगवते 

भेंडी ही अशी एक भाजी आहे जी उष्ण आणि दमट हवामानात चांगली वाढते. ती कुंड्यांमध्ये किंवा छोट्या किचन गार्डनमध्ये सहजपणे वाढवता येते. भेंडी सुमारे दीड ते दोन महिन्यांत काढणीसाठी तयार होते. त्यामुळे ही भाजी नक्की तुम्ही पेरू शकता 

Gardening Tips: घरात तिखट हिरव्या मिरचीची लागवड कशी करावी, सोप्या टिप्स

काकडीचे वेलही लवकर तयार होतील

उन्हाळा आणि पावसाळ्यात काकडीची मागणी वाढते. पावसाळ्यापूर्वी लावलेली काकडीची रोपे पुरेशा ओलाव्यामुळे वेगाने वाढतात. नियमित पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे तुम्ही आता काकडीचे वेल लाऊ शकता. याशिवाय आपल्या जेवणात कोशिंबीरसाठी काकडी असणे उत्तम ठरते. आरोग्यासाठीही काकडी नियमित खाणे फायदेशीर ठरते.  

हिरवी मिरची रोप 

हिरव्या मिरचीची रोपे जवळजवळ वर्षभर लावता येतात, परंतु पावसाळ्यापूर्वी लावलेली रोपे लवकर वाढतात. एकदा रोपे तयार झाली की, ती अनेक महिने ताज्या मिरच्या देतात. घरीच तुम्ही मिरच्यांची लागवड सोप्या पद्धतीने करू शकता. याशिवाय बाजारच्या सुकलेल्या मिरच्या वापरण्यापेक्षा घरच्या मिरच्यांचा वापर उत्तम होतो.  

घरच्या घरी किचन गार्डन बनवायचे असेल तर या गार्डनिंग टिप्स वापरा

वांगंही ठरेल फायदेशीर 

याशिवाय  वांग्याच्या रोपांना हलका ओलावा आणि पुरेसा सूर्यप्रकाश आवडतो. पावसाळ्यापूर्वी तुम्ही घरीच वांग्याची रोपं लावा. रोपे वेगाने वाढतील आणि पावसाळ्यात चांगले पीक देतील. वांग्याचं भरीत, वांग्यांची भाजी, काप हे सर्व करण्यासाठी घरातील किचन गार्डनमधील ताजी वांगी नक्कीच अप्रतिम ठरतील. 

यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात जाणून घ्या 

  • तुमच्या किचन गार्डनच्या मातीत कंपोस्ट किंवा खत घालण्याची खात्री करा
  • पावसाचे पाणी साचू नये म्हणून पाण्याचा चांगला निचरा ठेवा 
  • रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा
  • जर या भाज्या योग्य वेळी लावल्या तर, पावसाळ्यात तुमचे स्वयंपाकघर ताज्या, पौष्टिक, घरगुती भाज्यांनी भरलेले असू शकते
  • यामुळे केवळ पैशांची बचत होणार नाही, तर तुम्हाला सेंद्रिय भाज्यांच्या चवीचाही आनंद घेता येईल

Web Title: Kitchen garden tips how to grow vegetables at home before monsoon easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • gardening tips
  • lifestyle news in marathi
  • vegetable

संबंधित बातम्या

Teenage Parenting Tips:  Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!
1

Teenage Parenting Tips: Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
2

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
3

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.