(फोटो सौजन्य – Pinterest)
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती हा सण साजरा केला जातो. हा सण भगवान हनुमानाला समर्पित आहे. हिंदू धर्मात भगवान हनुमानाला विशेष महत्त्व आहे, त्यांना कलियुगातील देव मानले जाते. हनुमान जयंती निमित्त लोक पूजा करून, उपवास करतात असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह-नक्षत्रांचे शुभ फळ मिळते, वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते आणि अनेक समस्यांपासून आपली मुक्तता होते असे मानले जाते. हनुमानाकडे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची शक्ती आहे असे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना संकटमोचन असे म्हटले जाते.
हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणी लावा खास वातीचा दिवा, संकटांपासून होईल मुक्तता
हनुमान जयंतीचे महत्त्व
हनुमानाला एक शक्तिशाली देव मानले जाते. ते भगवान रामाचे भक्त होते. त्यांच्या जयंतीनिमित्तच हा दिवस साजरा केला जातो. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला. शास्त्रांनुसार, लोक यादिवशी त्यांची पूजा करतात आणि आपलं त्यांच्यापुढे आपलं साकडं ठेवतात. याकाळात हनुमानाची पूजा केल्यास भूत आणि नकारात्मक शक्तींचाही अंत होते असे मान्यता आहे. या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करण्याला विशेष महत्त्व आहे.
हनुमान जयंती कशी साजरी करावी
हनुमान जयंती हा हिंदू सण आहे जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी काहीजण हनुमान मंदिराला भेट देऊन मंदिरात पूजा-विधी करतात. तर काहीजण घरीच हा दिवस साजरा करणे पसंत करतात.
पूजा आणि अभिषेक
हनुमान जयंतीनिमित्त भक्त हनुमानाच्या मंदिरात जातात आणि तिथे पूजा-अभिषेक करून हनुमानाचे नामस्मरण करतात. सूर्योदयापूर्वी हनुमान चालीसा पठण करून हनुमान पूजा केली जाते. हनुमानाची पूजा केल्याने चिंता दूर होतात, कुंडलीतील ग्रहांच्या नकारात्मक स्थानाचा प्रभाव कमी होतो, संपत्ती आणि आरोग्य मिळते आणि येणाऱ्या अडचणी-अडथळे दूर होतात असे मानले जाते.
उपवास
हनुमान जयंतीनिमित्त अनेकजण उपवास-व्रतवैकल्य करतात. उपवासात भक्तानं काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. असे केल्याने हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील अशी लोकांची धारणा आहे.
गुरु ग्रह करणार मृगशिरा नक्षत्रात भ्रमण, या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता
प्रसाद अर्पण करणे
हनुमान जयंतीनिमित्त घरी वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवले जातात. प्रसादरूपी बेसन लाडू, मोतीचूर लाडू, बुंदी, रोट, इमरती, केसरी भात, साबुदाण्याची खीर तयार केली जाते आणि हनुमानाला ती अर्पित केली जाते.
हनुमान चाळीस पठण
हनुमान जयंतीच्या दिवशी लोक हनुमानाचे स्मरण करून, हनुमान चालीसाचे पठण करतात. हनुमान चालीसाचे वारंवार जप केल्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती सुधारते असे मानले जाते.