Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासेप्रेमींसाठी खास! सुगंधित आणि लज्जतदार चवीने भरलेली डिश; जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल ‘बटर गार्लिक प्रॉन्स’ रेसिपी

Butter Garlic Prawns Recipe : मासेप्रेमी असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच फार आवडेल. बटर आणि लसणाच्या स्वादात रंगून गेलेले हे प्रॉन्स चवीला फार छान लागतात आणि बनवायलाही फक्त १० मिनिटे लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2025 | 02:26 PM
मासेप्रेमींसाठी खास! सुगंधित आणि लज्जतदार चवीने भरलेली डिश; जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल 'बटर गार्लिक प्रॉन्स' रेसिपी

मासेप्रेमींसाठी खास! सुगंधित आणि लज्जतदार चवीने भरलेली डिश; जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल 'बटर गार्लिक प्रॉन्स' रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

सीफूडप्रेमींसाठी प्रॉन्स हा नेहमीच आवडीचा पदार्थ असतो. विशेषत: प्रॉन्सची भाजी, फ्राय किंवा करी आपण नेहमी खातो. पण कधी कधी साध्या आणि जलद बनणाऱ्या पण तरीही रेस्टॉरंटसारख्या टेस्ट असलेल्या रेसिपीची चव घ्यावीशी वाटते. अशा वेळी बटर गार्लिक प्रॉन्स हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं कारण बटरची क्रीमी चव, लसूणाचा सुगंध आणि प्रॉन्सचा मस्त रसाळपणा मिळून हा पदार्थ खूपच आकर्षक लागतो.

साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्य नाश्त्यासाठी बनवा साबुदाण्याचे कस्टर्ड

ही डिश बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि खास करून संध्याकाळच्या स्टार्टरसाठी किंवा डिनरसोबत साइड डिश म्हणून सर्व्ह करता येते. बटर गार्लिक प्रॉन्स खायला सोपे, हलके आणि चविष्ट लागतात. थोडंसं लिंबू पिळलं की अजूनच झणझणीत चव येते. पार्टी, गेट-टुगेदर किंवा कुटुंबियांसाठी खास जेवण बनवताना ही रेसिपी नक्की करून बघा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • मोठे प्रॉन्स – २५० ग्रॅम (साफ करून धुऊन घ्या)
  • बटर – ३ टेबलस्पून
  • लसूण – १०-१२ पाकळ्या (बारीक चिरून)
  • हिरवी मिरची – २ (लांब चिरून)
  • काळी मिरी पूड – १ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख… कोशिंबीरची सोपी रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम सर्वात आधी प्रॉन्स स्वच्छ करून मीठ व थोडासा लिंबाचा रस लावून १० मिनिटं मॅरिनेट करून ठेवा.
  • कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची टाका.
  • लसूण सोनेरी होऊ लागला की त्यात मॅरिनेट केलेले प्रॉन्स टाका.
  • प्रॉन्स मध्यम आचेवर ५-६ मिनिटे परतून घ्या. (जास्त शिजवू नका, नाहीतर प्रॉन्स रबरासारखे होतात.)
  • आता त्यात काळी मिरी पूड आणि मीठ टाका.
  • गॅस बंद करण्याआधी लिंबाचा रस आणि वरून कोथिंबीर शिंपडा.
  • गरमागरम बटर गार्लिक प्रॉन्स प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा.
  • ही डिश गरमागरम ब्रेड, गार्लिक नान, किंवा अगदी राइससोबत पण अप्रतिम लागते.

Web Title: Know how to make butter garlic prawns recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक
1

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
2

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
3

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
4

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.