Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा, सोपा अन् पारंपरिक… घरी बनवा आगरी कोळी स्टाईल नारळी भात! गणेशाच्या नैवेद्यात एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी

Coconut Rice Recipe : आगरी कोळी समाजात नारळी भाताला विशेष महत्त्व आहे. याची साधी पण सुगंधित चव या पदार्थाला आणखीन खास बनवते. चला जाणून घेऊया याची एक सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2025 | 03:20 PM
साधा, सोपा अन् पारंपरिक... घरी बनवा आगरी कोळी स्टाईल नारळी भात! गणेशाच्या नैवेद्यात एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी

साधा, सोपा अन् पारंपरिक... घरी बनवा आगरी कोळी स्टाईल नारळी भात! गणेशाच्या नैवेद्यात एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी

Follow Us
Follow Us:

भात हा एक असा पदार्थ आहे जो कसाही बनवला तरी चवीला चविष्टच लागतो. समुद्रकिनारी राहणाऱ्या आगरी-कोळी समाजाच्या जेवणात मासे, तांदूळ आणि नारळ हे त्रिसूत्री घटक कायमचे दिसतात. समुद्राच्या लाटांसारखे मनमोकळे जीवन जगणारे हे लोक साधे, झटपट पण चविष्ट पदार्थ बनवतात. त्यात नारळी भाताला एक विशेष मान मिळतो. नारळी भात चवीला साधा पण चविष्ट असा लागतो. बाप्पाचे आगमन झाले आहे अशात गणपतीच्या नैवेद्यात तुम्ही नारळी भाताचा समावेश करू शकता.

गणेश उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बेसन हलवा, झटपट तयार होईल पदार्थ

सण-उत्सव, श्रावण-भाद्रपदातील नारळी पौर्णिमा किंवा खास पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी हा भात बनवला जातो. साध्या तांदळात किसलेला गोडसर नारळ, साजूक तूप, सुगंधी मसाले हे सर्व मिळून नारळी भात अप्रतिम लागतो. गोडसर आणि मसालेदार अशी आगरी-कोळी पद्धती ही खासियत आहे. हा भात चवदार असून पोटभरीचा आहे. सणासुदीच्या वातावरणात कुटुंबीय एकत्र बसून गरमागरम नारळी भाताचा आस्वाद घेण्यात वेगळेच सुख आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • २ कप तांदूळ
  • १ कप ताजा नारळ किस
  • ३ टेबलस्पून साजूक तूप
  • ४–५ लवंगा
  • १ छोटा दालचिनी तुकडा
  • १ तमालपत्र
  • ८–१० काजू (तुपात परतलेले)
  • मीठ – चिमूटभर
  • ४ कप पाणी
रात्रीच्या जेवणाला बनवा गरमा गरम आणि पोटभरणीचा मसालेदार ‘सोया पुलाव’; वरून घाला तुपाची धार अन् रंगतदार करा मेजवानी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • एका भांड्यात साजूक तूप गरम करून त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी घालून फोडणी द्या.
  • आता त्यात नारळाचा किस हलक्या आचेवर काही मिनिटे परतून घ्या.
  • आता यात भिजवलेला तांदूळ आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य नीट एकत्रित करा.
  • आता शिजलेला तांदूळ आणि नारळ-गुळाचे मिश्रण हलक्या हाताने मिसळा आणि यात ४ कप पाणी घाला.
  • शेवटी यावर झाकण ठेवून मंद आचेवर १५ मिनिटे भात छान शिजवून घ्या.
  • भातावर तुपात परतलेले काजू-मनुका घाला आणि तयार भात एक प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा.

FAQs (संबंधित प्रश्न)

नारळी भात म्हणजे काय?
नारळी भात हा ताज खोबरं आणि तांदूळ वापरून बनवलेला एक भाताचा पदार्थ आहे, हा चवीला साधा पण चविष्ट असा लागतो.

नारळी भात कोणत्या सणांना बनवतात?
हा भात विशेषतः नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पौर्णिमा या सणांच्या वेळी बनवला जातो.

Web Title: Know how to make coconut rice at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.