(फोटो सौजन्य: Instagram)
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये पुलावाला एक वेगळेच स्थान आहे. भातावर आधारित हा पदार्थ हलका, झटपट तयार होणारा आणि चविष्ट असल्यामुळे घरगुती जेवणात, डब्यात किंवा खास पाहुण्यांसाठी बनवला जातो. पुलावाची खासियत म्हणजे त्यात वापरलेले विविध मसाले, भाज्या आणि कधी कधी वेगवेगळे प्रोटिनयुक्त घटक. आजकाल आरोग्यदायी आहाराला अधिक महत्त्व दिले जात असल्यामुळे सोयाबीनचा वापर स्वयंपाकात वाढला आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटिन असते आणि ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
सोया पुलाव हा एक पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर जेवणाचा पर्याय आहे. यात सोयाबीनचे तुकडे, सुगंधी बासमती तांदूळ, मसाले आणि भाज्या घालून बनवला जातो. हा पुलाव केवळ प्रोटिनने समृद्ध नसून चवीलाही अतिशय छान लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पुलाव दुपारच्या जेवणात, रात्रीच्या डिनरमध्ये किंवा खास प्रसंगी सहज बनवता येतो.
साहित्य :
कृती :
सोया पुलाव म्हणजे काय?
सोया पुलाव हा सोया चंक्स आणि तांदूळ वापरून तयार केलेला एक भारतीय डिश आहे. हा एक आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ आहे, ज्यात सोयाबीनमुळे प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
सोया पुलावचे फायदे काय?
सोया चंक्स हे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत. हा शरीरात प्रोटीनची कमतरता भरून काढतो.