Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

Chicken Donne Biryani Recipe : ह्या बिर्याणीचा खासपणा म्हणजे तिचा हिरवा मसाला, जो ना फार तिखट असतो. साधेपणा, नैसर्गिक चव आणि सुगंध, हेच चिकन डोने बिर्याणीचं वैशिष्ट्य आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 09:33 AM
बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकाची फेमस 'चिकन डोने बिर्याणी' ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकाची फेमस 'चिकन डोने बिर्याणी' ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकात चिकन डोने बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे
  • या बिर्याणीची चव इतर बिर्याणीपेक्षा थोडी हटके असते
  • साधी, सुगंधित आणि पारंपरिक मसाल्यांचा मिलाफ या बिर्याणीला खास बनवतो
बिर्याणी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतात बिर्याणीचे अनेक प्रकार आहेत, हैदराबादी, लखनवी, कोल्हापुरी, पण बेंगळुरुची “चिकन डोने बिर्याणी” ही एक वेगळीच खासियत आहे. ‘डोने’ म्हणजे पाने किंवा बाऊलसारखी डबी, ज्यात बिर्याणी सर्व्ह केली जाते. ह्या बिर्याणीचा स्वाद तिच्या मसाल्यांमुळे, पुदिना-कोथिंबिरीच्या हिरव्या चवीमुळे आणि कोमट तांदळाच्या सुगंधामुळे विशेष असतो. कर्नाटकातील मिलिटरी हॉटेल्समध्ये ही बिर्याणी प्रसिद्ध आहे आणि ती साध्या तरीही रसरशीत मसाल्यांमुळे मन जिंकते. याची रेसिपी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया, ही झणझणीत, सुगंधी आणि स्वादिष्ट चिकन डोने बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची.

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत अख्या मुगाचा खाकरा, नोट करून घ्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ

साहित्य:

चिकन मॅरिनेशनसाठी:

  • चिकन – 500 ग्रॅम (मध्यम तुकडे)
  • दही – ½ कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
हिरवा मसाला:
  • पुदिन्याची पाने – 1 कप
  • कोथिंबीर – 1 कप
  • हिरव्या मिरच्या – 4 ते 5
  • आले – 1 इंच
  • लसूण पाकळ्या – 8 ते 10
  • किसलेला नारळ – 2 टेबलस्पून
  • थोडेसे पाणी (मिक्सिंगसाठी)
बिर्याणीकरता:
  • बासमती किंवा जीरकसांबा तांदूळ – 2 कप (धुऊन अर्धवट शिजवलेला)
  • कांदे – 2 मोठे (पातळ चिरलेले व सोनेरी तळलेले)
  • तेल – 4 टेबलस्पून
  • तूप – 1 टेबलस्पून
  • तमालपत्र – 2
  • लवंगा – 4
  • दालचिनी – 1 तुकडा
  • वेलदोडे – 3
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – गरजेनुसार
झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल ‘पाटवडी रस्सा’; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन त्यात दही, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, हळद आणि लाल तिखट घालून नीट मिक्स करा. ते किमान 1 तास मॅरिनेट होऊ द्या.
  • मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण आणि नारळ थोड्याशा पाण्यासोबत बारीक वाटून घ्या. हा हिरवा मसाला डोने बिर्याणीचा आत्मा आहे.
  • एका जाड बुडाच्या भांड्यात तेल आणि तूप गरम करा. त्यात तमालपत्र, लवंगा, दालचिनी आणि वेलदोडे टाका.
  • मग मॅरिनेट केलेले चिकन घाला आणि 10–12 मिनिटे परतून घ्या.
  • चिकन अर्धवट शिजल्यावर त्यात वाटलेला हिरवा मसाला घाला आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
  • मसाला चिकनला नीट लागला पाहिजे.
  • आता शिजवलेला अर्धवट तांदूळ त्यावर पसरवा. थोडे तळलेले कांदे, थोडे तूप आणि मीठ वरून घाला.
  • भांड्यावर झाकण ठेवून कमी आचेवर 15–20 मिनिटे दम द्या. यावेळी वाफ बाहेर जाऊ नये.
  • दम झाल्यावर झाकण काढा आणि बिर्याणी हलक्या हाताने मिसळा. सुगंधित, मसालेदार चिकन दोण्ने बिर्याणी सर्व्ह करण्यास तयार आहे.
  • ही बिर्याणी पारंपरिक पद्धतीने ‘दोण्ने’ म्हणजेच केळीच्या पानांच्या डिशमध्ये सर्व्ह केल्यास तिचा स्वाद अधिक खुलतो.
  • सोबत रायता, कांदा-लिंबाचा सलाड आणि उकडलेले अंडे दिल्यास संपूर्ण जेवण पूर्ण होते.

Web Title: Know how to make karnataka style chicken donne biryani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • biryani
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी
4

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.