 
        
        १५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत अख्या मुगाचा खाकरा
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाकतात. नाश्ता न करता उपाशी पोटी कामानिमित्त बाहेर निघून जातात. पण सकाळच्या वेळी साथीचे आजाराचे विषाणू आणि इतर गंभीर आजाराचे विषाणू सक्रिय होतात आणि शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. याशिवाय नाश्त्यात अतिशय हलके आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास वजन कायमच नियंत्रणात राहील आणि लवकर भूक लागणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अख्या मुगाचा खाकरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते. खाकरा हा पदार्थ प्रामुख्याने राजस्थानमध्ये बनवला जातो. मुगाच्या डाळीमध्ये फायबर, आयर्न आणि मॅग्नेशियम इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय मूग खाल्ल्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते. चला तर जाणून मुगाच्या डाळीचा खाकरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश






