Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

कोळदुर्ग किल्ल्याजवळील धबधब्यावर दुर्गम सह्याद्री ट्रेकर्सच्या तरुणांकडून वॉटरफॉल रॅपलिंग करण्यात येत आहे. हेल्मेट, हार्नेस आणि सुरक्षा दोरासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या साहसी उपक्रमामुळे परिसरातील साहसी पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 09:00 AM
कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • कोळदुर्ग किल्ल्याजवळील धबधब्यात तरुणांकडून सुमारे 100 फूट वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवला जात आहे.
  • हेल्मेट, हार्नेस आणि सुरक्षा दोरासह तज्ज्ञांच्या देखरेखीखाली साहसी रॅपलिंगचा उपक्रम पार पडत आहे.
  • तासगाव-खानापूर परिसरातील दुर्गभ्रमंती आणि साहसी पर्यटनाला या उपक्रमामुळे नवी ओळख मिळत आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दुर्गभ्रमंतीसोबत साहसी उपक्रमांची आवड असलेल्या तरुणांसाठी कोळदुर्ग किल्ला परिसरातील वॉटरफॉल रॅपलिंग आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तासगाव-सांगली येथील ‘दुर्गम सह्याद्री’ ट्रेकर्स ग्रुपच्या तरुणांकडून शुक्राचारी गावाजवळील धबधब्यात सुमारे 100 फूट खोल रॅपलिंगचा थरार अनुभवला जात आहे.

तासगाव आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर असलेला कोळदुर्ग किल्ला पावसाळ्यात हिरवाईने नटत असतो. किल्ल्याच्या परिसरातील धबधबा या काळात आकर्षणाचे केंद्र बनत असून, त्याच ठिकाणी दोराच्या साहाय्याने कडा उतरण्याचा साहसी थरारक अनुभव घेतला जात आहे. धबधब्याच्या प्रवाहातून खाली उतरताना तरुणांना ट्रेकिंगसोबत रॅपलिंगच्या साहसाचाही अनुभव मिळत आहे.

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

रॅपलिंगसारख्या साहसी प्रकारात केवळ धाडस पुरेसे नसते, तर योग्य प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि सुरक्षा उपकरणांचा वापरही महत्त्वाचा ठरत असतो. या रॅपलिंगच्या उपक्रमात हेल्मेट, हार्नेस आणि सुरक्षा दोराचा वापर केला जात असतो, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली इथे दोरखंडानी धबधबा चढला उतरला जातो, ज्याला रॅपलिंग असे म्हणले जाते. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

सह्याद्रीतील किल्ले, घाटवाटा आणि धबधबे यांची भटकंती करणाऱ्या तरुणांमध्ये अशा साहसी उपक्रमांविषयी दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. कोळदुर्गसारख्या तुलनेने कमी परिचित आणि ‘Untouched From Human Life’ ठिकाणांकडे पर्यावरणपूरक साहसी पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्याची संधीही निर्माण होत आहे.

महिमंडणगडावर ‘शिवमुद्रा’ची दुर्गसंवर्धन मोहीम; भैरी भवानीला जलाभिषेक, गडवाटा सुरक्षित करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

रॅपलिंग हा तसा साहसी क्रीडा प्रकार असल्याने त्यासाठी सशक्त शारीरिक क्षमता आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. वय जास्त असलेल्या किंवा शारीरिक अडचणी असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय अशा उपक्रमात सहभागी होऊ नये, असे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

सांगली-सातारा भागातून प्रथमच अशा स्वरूपाचे वॉटरफॉल रॅपलिंग होत असल्याने स्थानिक साहसी पर्यटनाच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओ ‘दुर्गम सह्याद्री’ ट्रेकर्सच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले जात असून, कोळदुर्ग परिसरातील अत्यंत साहसी दुर्गभ्रमंतीकडे तरुणांचे लक्ष मोठ्या वेगाने वेधले जात आहे.

Web Title: Koladurg fort waterfall rappelling sahyadri adventure tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Trekking

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
2

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
3

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.