Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

Panjiri and Panchamrut Recipe : गोपाळकालाचा वाढदिवस म्हणजे सगळीकडे उत्साहाची अन् आनंदाची एक अनोखी लहर... या खास दिवशी कृष्णाला खुश करायचं असेल तर घरी पंजिरी आणि पंचामृताचा नैवेद्य हा बनलाचं पाहिजे!

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2025 | 10:00 AM
Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

Follow Us
Follow Us:

कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि आनंदोत्सवाचा सण आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री झाला असे मानले जाते. या दिवशी भक्तगण उपवास, जागरण, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक विधी करून भगवान कृष्णांची पूजा करतात. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांना आवडणारे पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यात विशेषत: पंजिरी आणि पंचामृत यांचा समावेश होतो.

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

पंजिरी ही तूप, गव्हाचे पीठ, साखर आणि सुकामेवा यापासून बनवली जाते. ही केवळ प्रसादासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. तिचा सुगंध आणि गोडसर चव मन मोहून टाकते. पंचामृत हे दुध, दही, मध, साखर आणि तूप या पाच पवित्र घटकांनी बनवले जाते. पाचही घटक शुद्धता, आरोग्य आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जातात. पूजा विधीमध्ये भगवान कृष्णांना स्नान घालण्यासाठी आणि प्रसाद म्हणून पंचामृताचा वापर होतो. ही दोन्ही पाककृती अतिशय सोप्या, पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत. चला तर मग, जन्माष्टमीचा आनंद वाढवणाऱ्या या खास रेसिपीज सविस्तर जाणून घेऊया.

कृष्ण जन्माष्टमी स्पेशल – पंजिरी रेसिपी

साहित्य

  • गव्हाचे पीठ – १ कप
  • तूप – ½ कप
  • साखर पावडर – ½ कप
  • काजू – २ चमचे (चिरून)
  • बदाम – २ चमचे (चिरून)
  • पिस्ता – २ चमचे (चिरून)
  • सुके खोबरे किस – २ चमचे
  • वेलची पावडर – ½ चमचा
कृती
  • यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ टाकावे.
  • मंद आचेवर पीठ सतत ढवळत भाजावे, तोपर्यंत की ते सोनेरी रंगाचे व सुगंधी होईल.
  • भाजताना काळजी घ्या, पीठ जळू नये.
  • पीठ छान भाजल्यानंतर त्यात काजू, बदाम, पिस्ता व सुके खोबरे घालून २ मिनिटे परतावे.
  • गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
  • पूर्ण थंड झाल्यावर त्यात साखर पावडर व वेलची पावडर मिसळावी.
  • सर्व घटक नीट एकत्र करून प्रसाद म्हणून अर्पण करावे.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

कृष्ण जन्माष्टमी स्पेशल – पंचामृत रेसिपी

साहित्य

  • दूध – १ कप
  • दही – ½ कप
  • मध – २ चमचे
  • साखर – २ चमचे
  • तूप – १ चमचा
  • वेलची पावडर – चिमूटभर
  • तुळशीची पाने – २ ते ३ (ऐच्छिक)
कृती
  • यासाठी सर्वप्रथम एका पवित्र व स्वच्छ भांड्यात दूध घेऊन त्यात दही मिसळावे.
  • त्यात मध, साखर, तूप घालावे.
  • सर्व मिश्रण चमच्याने नीट ढवळावे.
  • वेलची पावडर व तुळशीची पाने घालून पुन्हा मिसळावे.
  • हे पंचामृत भगवान कृष्णांना अर्पण करावे व नंतर भक्तांना प्रसाद म्हणून द्यावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

जन्माष्टमी म्हणजे काय?
हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे स्मरण करणारा एक हिंदू सण आहे.

कृष्ण जन्माष्टमी का साजरा केली जाते?
कृष्णाचा जन्म, शिकवण आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Web Title: Krishna janmashtami 2025 in these special occassion make panjiri and panchamrut in traditional way note down the easiest recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • food recipe
  • Krishna Janmashtami 2025
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.