सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कायमच बाहेरून विकत आणलेले टेस्टी आणि चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरील विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेलेखराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वीट कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे घाईगडबडीमध्ये कोणताही पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही मक्याच्या दाण्यांचे चाट बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया स्वीट कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ