गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पा येण्याच्या काही दिवस आधी घरात गोडाचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. कायमच उकडीचे मोदक, पुरणाचे मोदक, गुलकंद मोदक इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बिस्कीट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या क्रीम किंवा शुगर फ्री बिस्किटांचा वापर करून तुम्ही मोदक बनवू शकता. बऱ्याचदा घाईगडबडीमुळे तळणीचे, उकडीचे मोदक बनवण्याचा सगळ्यांचा खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बिस्किटांचा वापर करून मोदक बनवू शकता. बिस्किटांचा मोदक बनवताना खूप कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. अनेकांना मोदकाची पारी बनवून कळ्या पडता येत नाहीत, अशावेळी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये बिस्किटांचे मोदक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बिस्कीट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)