Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रंची Kurkure Burger कधी खाल्ला आहे का? नाही तर लगेच नोट करा रेसिपी; लहान मुलं होतील खुश

कुरकुरे बर्गर ही एक मजेदार आणि हटके डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल! स्ट्रीटवर हा पदार्थ फार लोकप्रिय आहे मात्र सध्याच्या या पावसाळी वातावरणात हा पदार्थ घरीच बनवून खाल्लेला अधिक चांगला!

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 15, 2025 | 11:49 AM
क्रंची Kurkure Burger कधी खाल्ला आहे का? नाही तर लगेच नोट करा रेसिपी; लहान मुलं होतील खुश

क्रंची Kurkure Burger कधी खाल्ला आहे का? नाही तर लगेच नोट करा रेसिपी; लहान मुलं होतील खुश

Follow Us
Close
Follow Us:

बर्गर ही मुलांची आवडती फास्ट फूड डिश आहे, पण जर त्यात थोडासा क्रंच आणि हटके ट्विस्ट दिला तर ती अधिक चविष्ट आणि मजेदार होते. आज आपण बनवणार आहोत “कुरकुरे बर्गर”, जो कुरकुरीत कुर्कुरे चिप्स, व्हेज टिक्की आणि चविष्ट सॉससह तयार होतो. हा बर्गर खास पार्टीसाठी, टिफिनसाठी किंवा कधीही खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. घरच्या घरी कमी वेळात आणि निवडक साहित्यापासून तुम्ही ही डिश घरीच तयार करू शकता.

शाकाहारी प्रेमींसाठी खास! यंदाच्या विकेंडला घरी बनवून पहा रेस्टाॅरंट स्टाइल Soya Chili; नोट करा रेसिपी

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत अशात बाहेरचे अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सध्या फूड पॉइजनिंगचे प्रमाण फार वाढत आहे अशात चविष्ट आणि रुचकर पदार्थ घरीच बनवा आणि कुटुंबालाही खुश करा. आजची ही कुरकुरीत रेसिपी तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला नोट करूयात याचे साहित्य आणि कृती.

साहित्य

टिक्कीसाठी:

  • बटाटे – 2 मध्यम (उकडून मॅश केलेले)
  • गाजर – 1 (किसलेले)
  • कांदा – 1 (चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या – 1 (चिरलेली)
  • धणे-जिरे पूड – 1/2 चमचा
  • गरम मसाला – 1/4 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • ब्रेडक्रंब्स – 1/2 कप
  • तेल – तळण्यासाठी
बर्गरसाठी:
  • बर्गर बन – 2
  • मेयोनीज – 2 चमचे
  • टोमॅटो केचप – 1 चमचा
  • कोथिंबीर – थोडी (चिरलेली)
  • कांदा – 1 (गोल चकत्या)
  • टोमॅटो – 1 (गोल चकत्या)
  • चीज स्लाइस – 1 (प्रत्येक बर्गरसाठी)
  • मक्याचे चिप्स – चुरा करून
  • मैदा – 1 चमचा
  • कोर्नफ्लोर – 1 चमचा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये मॅश केलेले बटाटे, किसलेले गाजर, कांदा, मिरची, धणे-जिरे पूड, गरम मसाला,
  • मीठ आणि ब्रेडक्रंब्स घालून सगळं नीट मिक्स करा.
  • टिक्कीच्या आकारात गोळे करून थोडं तेल लावलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करा.
  • एका प्लेटमध्ये मक्याचे चिप्स घ्या आणि त्याचा चुरा करा
  • आता एका वाडग्यात कोर्नफ्लोर , मैदा, मीठ आणि हलका मसाला घालून एक स्लरी तयार करा
  • बर्गर बनवण्यासाठी बर्गर बन मधून अर्धा चिरून घ्या. त्याच्या दोन्ही भागांवर मेयोनीज व केचप लावा.
  • एकाच भागावर टिक्की, त्यावर कांदा व टोमॅटोच्या चकत्या, वर चीज स्लाइस आणि थोडी कोथिंबीर ठेवा. मग दुसरा बन ठेवून दाबा.
  • तयार बर्गर स्लरीमध्ये बुडवून मग मक्याचे चुऱ्यात छान घोळवून घ्या
  • आता कढईत तेल गरम करून हा बर्गर त्यात छान डीप फ्राय करा, मंद आचेवरच याला तळा
  • गरमागरम कुरकुरीत बर्गर सॉस किंवा केचपसह खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • हवे असल्यास मेयोनीजमध्ये थोडासा चिली फ्लेक्स किंवा थाय सॉस घालून स्पायसी सॉस बनवू शकता.

Web Title: Kurkure burger is the most favourite fast food know how to make it at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा ‘पनीर रॅप’
1

Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा ‘पनीर रॅप’

जेवणाची रंगत वाढवणारा टेस्टी पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, नोट करा रेसिपी
2

जेवणाची रंगत वाढवणारा टेस्टी पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, नोट करा रेसिपी

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’
3

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे ‘या’ पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी
4

हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे ‘या’ पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.